आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी घाटातील चिखल, माती काढण्याचे काम युदधपातळीवर हाती घेतले आहे.
परशुराम घाटातून प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूकीची कोंडी
मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत. परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या चिरणी आंबडस मार्गावरही वाहतूकीची कोंडी झाली होती. पहाटे पडलेल्या पावसामुळे भरावातील मातीचा चिखल रस्त्यावर आल्याने वाहने चिखलात रुतली आहेत. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून नागरिकांना प्रवास सर्तकतेने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असलेला परशुराम घाट आणि कशेडी येथील खवटी घाट वगळून दुसऱ्या मार्गाचा वापर करता येऊ शकतो.
मुंबईकडून कोकणात जाताना महाड - लाटवण मार्गे दापोली आणि दापोली येथून दाभोळ - धोपावे फेरीबोटीने धोपावे येथून श्रृंगारतळी मार्गे थेट गुहागर आणि चिपळूण तसेच रत्नागिरी येथे जाता येते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.