आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्या प्राण्यासोबत हिंसा:कुत्र्याने बाइकचे सीट फाडल्याने तरुणाने लोखंडाच्या रॉडने मारुन-मारुन केली हत्या, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी अटकेत

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओमध्ये लोखंडी रॉडने मारताना दिसत आहे आरोपी

गोरेगावमध्ये एका भटक्या कुत्र्याची मारुन-मारुन हत्या करण्याच्या आरोपात 31 वर्षांच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, ही घटना मंगळवारी घडली होती. ज्यानंतर आरोपीला बांगुर नगर पोलिस पोलिसांनी अटक केली आहे.

भटक्या कुत्र्याला मारत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. एका व्यक्तीने याचा व्हिडिओ मुंबई पोलिस आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना टॅग केला. यानंतर गृहमंत्र्यांच्या निर्देशावर पोलिस सक्रिय झाले आणि बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली.

कुत्र्याने सीट फाटल्यामुळे मारले
ओरीपीचे नाव इमरान युनूस शाह असे आहे. तो एक सेल्समन म्हणून काम करतो. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, कुत्र्याने त्याच्या बाइकचे सीट कव्हर फाडले होते. यानंतर त्याला त्याने मारले. पोलिसांनी इम्रानविरोधात भादंवि कलम 429 आणि प्राणी क्रूरता अधिनियम 1960 च्या कलम 11 (1) (ए) अन्वये एफआयआर दाखल केला आहे.

व्हिडिओमध्ये लोखंडी रॉडने मारताना दिसत आहे आरोपी
अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये लोखंडाच्या दंड्याने कुत्र्याला मारले जात आहे आणि कुत्रा रक्तभंबाळ झाल्याचे दिसत आहे. यावेळी काही इतर लोकही तिथे उभे राहून तमाशा पाहत असल्याचे दिसते.

बातम्या आणखी आहेत...