आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये वाढली गुन्हेगारी:मुंबईत महिन्याला जवळपास 12 मर्डर, पुण्यातही 4 टक्क्यांनी वाढल्या हत्येच्या घटना; महिलांवरील अत्याचारात सुद्धा वाढ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमध्ये मुंबईत कमी आणि पुण्यात वाढल्या हत्या

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये वर्ष 2020 मध्ये दरमहा सरासरी 12 लोकांची हत्या झाली. एवढेच नाही तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात एका वर्षात खुनाच्या घटनांमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) ताज्या अहवालातून हा खुलासा झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये मुंबईत कमी आणि पुण्यात वाढल्या हत्या
एनसीआरबीच्या अहवालानुसार, मुंबईमध्ये वर्ष 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये हत्येची प्रकरणे 12 टक्के कमी झाले आहेत. 2018 मध्ये 164, 2019 मध्ये 168 आणि 2020 मध्ये 148 हत्येची प्रकरणे मुंबईच्या विविध पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहेत. पुण्यात हत्येची प्रकरणे 4 टक्के वाढली आहेत. 2018 मध्ये 73, 2019 मध्ये 74 आणि 2020 मध्ये वाढून 77 मर्डर केस पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहेत.

मुंबईमध्ये हत्येच्या 95.5 टक्के प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल
2020 मध्ये मुंबई पोलिसांनी हत्येच्या जवळपास 95.5 टक्के आणि पुणे पोलिसांनी 94.5 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले आहेत. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. येथे 2020 मध्ये हत्येची प्रकरणे जवळपास 8 टक्क्यांनी वाढले आहेत. नागपूर पोलिसांनी मर्डरच्या 97.8 टक्के प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल केली आहे. येथे 2018 मध्ये 72, 2019 मध्ये 90 आणि 2020 मध्ये 97 प्रकरणे दाखल झाले.

पुण्यात दोनपेक्षा जास्त महिलांवर रोज अपराध
पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे म्हटले जाते. परंतू वर्ष 2020 मध्ये येथे दररोज जवळपास दोन पेक्षा अधिक घटना या महिलांविरोधात घडल्या आहेत. एनसीबीआरच्या रिपोर्टनुसार वर्ष 2020 मध्ये पुण्याच्या विविध पोलिस स्टेशनमध्ये महिलांविरोधात अपराधाच्या एकूण 1,055 घटना घडल्या. पण दिलासादायक बाब म्हणजे, 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये महिलांविरोधातील गुन्ह्याची प्रकरणे 24 टक्के कमी झाली आहेत. 2019 मध्ये 1390 आणि 2018 मध्ये 1,481 महिलांविरोधातील गुन्ह्याची प्रकरणे पुण्यात दाखल झाली आहेत.

मुंबईमध्ये महिलांविरोधातील गुन्हे 30 टक्क्यांनी झाले कमी
मुंबई निर्भया कांडमुळे टीकेचा सामना करत असलेल्या मुंबई पोलिसांसाठी एनसीआरबीचा अहवाल दिलासादायक आहे कारण 2020 मध्ये मुंबईमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये 30 टक्के घट झाली आहे. खरेतर अजुनही मुंबईमध्ये दररोज जवळपास महिलांविरोधात 13 गुन्ह्याच्या घटना होत आहेत. मुंबईमध्ये 2019 मध्ये महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांचे 6,519 प्रकरणे विविध पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.

मुंबईमध्ये 4533, पुण्यात 1001 आणि नागपुरात 1037 लोकांना झाली शिक्षा
मुंबईमध्ये 2020 मध्ये एकूण 4,533 लोकांना आयपीसीच्या विविध कलमांखाली नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये शिक्षा झाली. अशाच प्रकारे पुण्यात 1,001 आणि नागपुरात 1,037 लोकांना शिक्षा झाली. या दरम्यान मुंबईमध्ये 2540, पुण्यात 547 आणि नागपुरात 2,229 लोकांना विविध प्रकरणात निर्दोष सोडण्यातही आले. मुंबईमध्ये 2020 मध्ये एकूण आयपीसीच्या कलमांखाली 54,188 लोकांना अटक करण्यात आली होती आणि 36,353 लोकांविरोदात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...