आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हायकोर्ट:कारने आसामला निघणार पुण्यातील तरुण, वडिलांच्या निधनानंतर मुंबई हायकोर्टाकडून घ्यावी लागली परवानगी

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 5 एप्रिल रोजी आसामात झाले वडिलांचे निधन, आता मिळाली अंत्यविधीत सहभागी होण्याची परवानगी

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन जारी करण्यात आला आणि सर्वांना आहे तेथे राहण्याचे आदेश देण्यात आले. अशात एका मुलाला आपल्या वडिलांच्या अंत्यविधीमध्ये जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागली आहे. पुण्यात राहणारा हा तरुण मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात सामिल होण्यासाठी निघणार आहे. मूळचा आसाम येथील रहिवासी असलेल्या तरुणाच्या वडिलांचे 5 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्याच अंत्यविधीमध्ये सामिल होण्यासाठी त्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर त्याला बाय रोड जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

कार्गो प्लेनमध्ये शक्य असेल तरी पाठवा, पण मला जाऊ द्या...

जस्टिस एके मेनन यांनी मंगळवारी बिन्नी ढोलानी याच्या याचिकेवर सुनावणी घेतली. तसेच त्याला पुणे शहरातून आसामच्या लंका शहरात रोडने जाण्याची परवानगी दिली आहे. ढोलानीने आपल्या याचिकेत म्हटले होते, की देशभर सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्था बंद असताना वडिलांच्या अंत्यविधीमध्ये कुठल्याही परिस्थितीत जायचे आहे. यासाठी एखाद्या कार्गो फ्लाइटमध्ये देखील जागा मिळत असेल तर मी जाण्यास तयार आहे. हायकोर्टाने आपले आदेश जारी करताना प्रशासनाला सुद्धा ढोलानीच्या प्रवासासाठी योग्य ती औपचारिकता पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारी वकिलांच्या युक्तीवादानंतर बाय रोड जाण्याची परवानगी

तत्पूर्वी सरकारी वकील अनिल सिंह यांनी कोर्टापुढे युक्तीवाद केला की केवळ ढोलानीच नव्हे, तर देशात अनेक जणांच्या नातेवाइकांचे निधन झाले आहे. तसेच ते सगळेच आप-आपल्या नातेवाइकांच्या अंत्यविधीमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. यापैकी काहींचा मृत्यू तर कोरोना व्हायरसमुळे झाला आहे. अशात लोकांना हवाई प्रवासाची परवानगी दिली जाऊ शकत नाही. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास या ढोलानी यांना रस्तेमार्गे कारने प्रवास करता येईल. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले जाउ शकतात. कोर्टाने सरकारी वकिलांचा हा युक्तीवाद मान्य करत ढोलानी यांना कारने जाण्यास परवानगी दिली आहे. यासाठी ढोलानीला आपल्या प्रवासाचा संपूर्ण रूट प्रशासनाला दाखवावा लागेल. जेणेकरून त्या-त्या ठिकाणी परवानगी मिळण्यासाठी सोय केली जाऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...