आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम करणे, न करणे ही महिलांची पसंती:महिला शिक्षित असली तरी तिने नोकरी करावीच हे बंधनकारक नाही -मुंबई हायकोर्ट

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला पदवीधर असल्यास तिला नोकरी करण्याची गरज नाही, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे म्हणाल्या की, महिला शिक्षित असेल तर तिने नोकरी करावी असे बंधनकारक होत नाही. तिला हवे असल्यास ती घरी देखील बसू शकते.

काय आहे संपूर्ण प्रकरण

पतीने दाखल केलेल्या फेरविचार अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यात पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले. यामध्ये पतीला पत्नीचा उदरनिर्वाह करण्याचे निर्देश देण्यात आले.

काम करायचे की नाही हे स्त्रीची निवड

या प्रकरणी सुनावणीदरम्यान पतीचे वकील अभिजीत सरवटे म्हणाले की, पत्नी नोकरी करत असतानाही पतीला पोटगी देण्याचे कौटुंबिक न्यायालयाने चुकीचे आदेश दिले आहेत. यावर न्यायमूर्ती भारती डांगरे म्हणाल्या की, घरातील स्त्रीने आर्थिक योगदान दिलेच पाहिजे, हे आमच्या समाजाने अद्याप मान्य केलेले नाही.

काम करणे किंवा न करणे ही स्त्रीची निवड आहे. न्यायाधीशांनी वकिलाला विचारले की, आज मी न्यायाधीश आहे, उद्या समजा मी घरी बसले. तर तुम्ही म्हणाल की, 'मी न्यायाधीश होण्यास पात्र आहे आणि मी घरी बसू नये'

पत्नीने देखभालीची मागणी केली होती

याप्रकरणी पती-पत्नीचा विवाह 2010 मध्ये झाला होता. 2013 मध्ये पत्नी आपल्या मुलीसोबत वेगळे राहू लागली. एप्रिल 2013 मध्ये महिलेने पती आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि कुटुंबाच्या भरणपोषणाची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...