आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मुसळधार पाऊस:सखल भागात पाणी साचल्यानंतर सर्वच कार्यालय बंद, रेड अलर्टसह भरतीचा इशारा, ठाण्यात एकाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीएमसीने सर्वच अनावश्यक सरकारी कार्यालय आणि प्रायव्हेट ऑफिस बंद करण्याचे केले आवाहन
  • कुलाबामध्ये सुमारे 269 मिमी, तर उपनगरातील सांताक्रूझमध्ये 87 मिमी पावसाची नोंद झाली

सोमवारी रात्री उशिरापासूनच मुंबई व परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे मंगळवारी सकाळपासूनच जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील सखल भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. कामकाजाच्या दिवसामुळे कार्यालयीन वाहकांना सतत त्रास होत आहे. हवामान विभागाने आज मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. महापालिकेने सर्व अनावश्यक सरकारी कार्यालये व खासगी कार्यालये बंद ठेवण्यास सांगितले आहे.

हवामान खात्याने दुपारी 12.45 वाजता समुद्रात उच्च भरतीचा इशारा दिला आहे. यावेळी, समुद्रात 5 मीटर उंच लाटा उसळू शकतात. लोकांना सतर्क राहण्यास आणि समुद्राच्या किनाऱ्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. या काळात शहरात पाऊस पडल्यास परिस्थिती गंभीर बनू शकते.

मुंबईच्या या भागात साचले पाणी
हिंदमाता, दादर, टीटी किंग्ज सर्कल, सायन, चेंबूर, अंधेरी, सांताक्रूझ आणि मुंबईतील इतर सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते वाहतुकीवरही तीव्र परिणाम होत आहे. अंधेरी अंडरपास बंद करण्यात आला आहे. कुलाबा येथे दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे 269 मिमी पावसाची नोंद झाली तर उपनगरी भागात सांताक्रूझ येथे 87 मिमी पावसाची नोंद झाली.

ठाण्यात एका व्यक्तीचा मृत्यू
मुंबईजवळ ठाण्यात पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. टीएमसी स्ट्रीटवर हनुमान मंदिराजवळ एका विजेच्या खांबात करंट उतरल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील या शहरात मुसळधार पाऊस
मुबई व्यतिरिक्त महाराष्ट्रात ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.