आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेक TRP प्रकरण:दोन महिन्यानंतर BARC चे माजी CEO पार्थो दासगुप्तांना जामीन मंजूर, पैसे घेऊन चॅनेलची TRP वाढवण्याचा आरोप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दासगुप्तांविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केली होती चार्जशीट

TRP घोटाळाप्रकरणी दोन महिन्यांपासून तुरुंगात असलेले BARC चे माजी CEO पार्थो दासगुप्तांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्यांना दोन लाख रुपयांचा पर्सनल बॉन्ड आणि दोन सॉल्वेंट सादर करण्यास सांगितले आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच टीमने दासगुप्तांना 24 डिसेंबरला ताब्यात घेतले होते.

कनिष्ठ कोर्टाकडून जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर दासगुप्तांनी जानेवारीमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, पहिली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. यानंतर खराब प्रकृतीचे कारण सांगत दुसरी याचिका दाखल केली होती.

पार्थो दासगुप्ता 2013 ते 2019 दरम्यान BARCचे CEO होते. BARC ती संस्था आहे, जी देशातील 45 हजार घरांमध्ये टीव्हीवर लागलेल्या बार-ओ-मीटरद्वारे सांगते की, आठवड्यात कुठले चॅनेल/मालिका/कार्यक्रम सर्वाधिक पाहिले जात आहेत.

दासगुप्तांविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केली होती चार्जशीट

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे CEO विकास खानचंदानी, रोमिल रामगडिया आणि पार्थो दासगुप्तांविरोधात TRP घोटाळ्याप्रकरणी 3400 पानांची सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 59 साक्षीदारांची साक्ष आणि 15 जानकारांच्या साक्षींचा समावेश आहे. यात फॉरेंसिक एक्सपर्टदेखील सामील आहेत.

अर्णब आणि दासगुप्तांमध्ये लास घेतल्याचे पुरावे आढळले

मुंबई पोलिसांनी आधी न्यायालयाला सांगितले होते की, रिपब्लिक टीव्हीचे एडिटर-इन-चीफ अर्णब गोस्वामींनी आपल्या दोन्ही चॅनेल्सची TRP वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना कथितरित्या लाखो रुपयांची लास दिली होती. मुंबई पोलिसांनुसार, पार्थो दासगुप्तांनी खुलासा केला आहे की, रिपब्लिक टीव्हीचे एडिटर-इन-चीफ अर्णब गोस्वामींनी त्यांना TRP मध्ये छेडछाड करण्यासाठी 40 लाख रुपये दिले होते.

बातम्या आणखी आहेत...