आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी व अभिनेता सोनू सूद हे स्वत:ला देवदूत समजू लागले आहेत. त्यांची कोरोनावरील औषधी खरेदी प्रकरणात काय भूमिका आहे याची चौकशी केली जावी,’ असे आदेश मुंबई हायकोर्टाने बुधवारी महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.
कोरोना, औषधी व इतर मुद्द्यांवर दाखल अनेक जनहित याचिकांवरील सुनावणीत न्या. एस. पी. देशमुख व जी. एस. कुलकर्णी यांच्या पीठाने म्हटले की, ‘आ. सिद्दिकी व अभिनेता साेनू स्वत:ला देवदूत समजत आहेत. त्यांनी औषधी खरी आहे की बनावट आहे तसेच तिचा पुरवठाही कायदेशीर होतो की नाही याची चौकशी केली.’
राज्य सरकारने माझगाव महानगर कोर्टात बीडीआर फाउंडेशन व विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिल्यानंतर कोर्टाने आ. सिद्दिकी आणि सूद यांच्यावर वरील टिप्पणी केली. बीडीआर फाउंडेशनवर विनापरवाना सिद्दिकींना रेमडेसिविरचा पुरवठ्याचा आरोप आहे. कुंभकोणी म्हणाले, सोनू सूदच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे.
सरकारने गुन्हा दाखल केला
संबंधित प्रकरणात राज्य सरकारने माझगाव महानगर कोर्टात बीडीआर फाउंडेशन व विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली. त्यानंतर कोर्टाने आ. सिद्दिकी आणि अभिनेता सोनू सूद यांच्यावर वरील टिप्पणी केली. बीडीआर फाउंडेशनवर विनापरवाना सिद्दिकींना रेमडेसिविरचा पुरवठ्याचा आरोप आहे. कुंभकोणी म्हणाले, सोनू सूदच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे.
यामुळे झाली नाही कारवाई
आशुतोष कुंभकोणी म्हणाले की, सिद्दिकी हे केवळ त्यांच्या परिचयाच्या लोकांनाच औषधे देत असल्याने त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सोनू सूद यांनी गोरेगावमधील लाईफलाईन केअर हॉस्पिटलमध्ये असलेल्या अनेक दुकानांतून औषधे घेतली असल्याचे कुंभकोणी म्हणाले.
वाटपात कोणताही भेदभाव नाही - केंद्र सरकार
म्यूकरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीच्या उपचारासाठी फंगल अँटी औषधे आवश्यकतेनुसार राज्यांना दिली गेली असल्याचे सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. महाराष्ट्रासह कोणत्याही राज्यांमध्ये औषध वाटपावरुन भेदभाव केला गेला नसल्याचेदेखील केंद्र सरकार म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.