आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIIT (आयआयटी) मध्ये प्रवेश घेण्यासाठी आता विद्यार्थांना संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (JEE) माहितीपत्रकानुसार उमेदवारांना बारावीच्या बोर्ड परीक्षेत किमान 75 टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे.
आयआयटी मध्ये प्रवेश घेण्यासाठी उच्च माध्यमिक परीक्षेत 75 टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.
कोर्टाचे म्हणणे काय?
या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालय म्हणाले, “या टप्प्यावर प्रवेश प्रक्रियेच्या चालू असलेल्या प्रक्रियेत आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. सरकारने विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा विचार या आधीच करणे आवश्यक होते.” या याचिकेवर याचिकाकर्ते आणि प्रतिवाद्यांचा मंगळवारी युक्तिवाद झाला होता. पण न्यायालयाकडून याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता.
नक्की याचिका काय होती?
IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये 75 टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल करण्यात यावा अशी याचिका अनुभा सहाय यांनी दाखल केली होती. हा पात्रता निकष गेल्यावर्षीपर्यंत लागू नव्हता. पात्रता निकषात अचानक करण्यात आलेल्या बदलामुळे लाखो विद्यार्थांना फटका बसू शकतो. असे निवेदनही सादर करण्यात आले होते.
परिणामांचा विचार करावा लागेल
पात्रता निकषाचे धोरण 2017 पासून लागू करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 ते 2022 पर्यंत हे धोरण शिथिल करण्यात आले होते. तसेच ही परीक्षा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसल्याने न्यायालयाने हस्तक्षेप केल्यास होणाऱ्या परिणामांचाही विचार करावा लागेल असे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे पात्रता शिथिल करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
याबाबत सुनावणी करताना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने याचिका निकालात काढली.
किती उमेदवार देतात IIT परीक्षा?
भारतात एकूण 23 IIT संस्था आहेत. आयआयटी संस्थेत प्रवेश मिळावा यासाठी दरवर्षी साधारण 8 ते 10 लाख विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यसाठी परीक्षा देतात. त्यातील केवळ 10-12 हजार जणांना या संस्थेत प्रवेश मिळतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.