आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Intelligence Cyber Cell Summoned To Former Intelligence Commissioner Rashmi Shukla, Accused Of Wrongly Tapping Phones; To Be Presented On Wednesday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात ट्रान्सफर-पोस्टिंग रॅकेट:माजी इंटेलिजेंस कमिश्नर रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर सेलचा समन्स, चुकीच्या पध्दतीने फोन टॅपिंग करण्याचा आरोप; बुधवारी व्हावे लागणार हजर

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रश्मी शुक्ला यांनी हे टॅपिंग 2019 दरम्यान केले.

महाराष्ट्र पोलिस डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर-पोस्टिंग रॅकेट चालवण्याचा आरोप करणाऱ्या राज्याच्या माजी इंटेलिजेंस कमिश्नर रश्मी शुक्ला यांच्या आडचणी वाढू शकतात. मुंबई सायबर सेलने बुधवारी शुक्ला यांची चौकशी करुन समन बजावला आहे. रश्मी शुक्ला यांना सायबर सेलचे एसीपी ए के जाधव यांच्या कार्यालयात येऊन जबाब नोंदवण्यास म्हटले आहे. शुक्ला यांचा आरोप आहे की, त्यांनी राज्य सरकार, होम डिपार्टमेंची मंजूरी न घेता अनेक मंत्री, आयपीएस अधिकारी आणि ब्यूरोक्रेट्सचे फोन टॅप केले आणि हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना लीक करुन आपल्या पदाचा दुरुपयोग केला.

रश्मी शुक्ला यांनी हे टॅपिंग 2019 दरम्यान केले. महाराष्ट्र डीजीपी संजय पांडे यांच्या आदेशानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात याप्रकरणी मुंबईच्या सायबर सेलमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. मात्र गुप्त माहिती लीक केल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरूद्ध हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

25 ऑगस्ट 2020 रोजी रश्मी शुक्ला इंटेलिजेंस विंगच्या आयुक्त असताना त्यांनी एक इंटेलिजेंस रिपोर्ट तयार केला आणि तो तत्कालीन डीजीपी सुबोध कुमार जयस्वाल यांना दिला. सुबोधकुमार जयस्वाल यांनी तत्कालीन एसीएस होम सीताराम कुंठा यांना नोटिस देऊन हा अहवाल दिला आणि चौकशीची मागणी केली.

या अहवालाच्या आधारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एका मोठ्या ट्रान्सफर रॅकेटचा आरोप केला होता. त्यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे कित्येक तासांचे रेकॉर्डिंग सादर केले होते.

मुख्य सचिवांनीही शुक्लाविरोधात चौकशी केली आहे
यापूर्वी रश्मी शुक्लांच्या विरोधात राज्याचे मुख्य सचिव सीताराम जे. कुंटे यांनीही तपास करून आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. अहवालात रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करून चुकीच्या आधारे माहिती देण्याचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर सरकारची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला.

अहवालात म्हटले आहे की आयपीएस अधिकारी शुक्ला यांनी भारतीय टेलिग्राफ कायद्यांतर्गत फोन टॅपिंगच्या अधिकृत परवानगीचा गैरवापर केला आहे. देशाच्या सुरक्षेचा मुद्दा हा आधार असल्याचे सांगून शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली, पण त्यांनी सरकारची दिशाभूल केली आणि वैयक्तिक कॉल रेकॉर्ड केले.

बातम्या आणखी आहेत...