आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mumbai | IPL | Marathi News | It Is The First Country In The 51 year History Of ODIs To Reach This Stage

भारत आज 1000 वा वनडे खेळणार:51 वर्षांच्या वनडेच्या इतिहासात हा टप्पा गाठणारा पहिलाच देश

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएलमुळे क्रिकेट अधिकच स्पर्धात्मक होणार, खेळाडूंवर दबावही वाढणार, यामुळे भारतीय क्रिकेट मानसिक आरोग्यात गुंतवणूक करणार
  • 1974 मध्ये पहिली वनडे खेळलेले खेळाडू सांगत आहेत भारतात क्रिकेटचे भविष्य

भारत रविवारी अहमदाबादेत वेस्ट इंडीजविरुद्ध ३ वनडेच्या मालिकेतील पहिला सामना खेळेल. हा भारताचा १००० वा आंतरराष्ट्रीय वनडे असेल. हा टप्पा गाठणारा भारत पहिलाच देश आहे. भारताने १३ जुलै १९७४ ला लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला वनडे खेळला होता. त्या संघात राहिलेले मदनलाल आणि फारुख इंजिनिअर सांगत आहेत पुढील १० वर्षांत भारताचे क्रिकेट कुठे असेल ते...

जेव्हा आम्ही पहिला वनडे खेळलो हाेते तेव्हा क्रिकेट इतका लांबचा पल्ला गाठेल, याचा कधी विचारही केला नव्हता. आगामी वर्षांत भारतीय क्रिकेटचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. आपल्याकडे चांगले युवा खेळाडू, मजबूत बेंच स्ट्रेंथ आणि उत्तम पायाभूत आराखडा आहे. कोचिंग सिस्टिमही खूप चांगली आहे. दरवर्षी नवी मैदाने बनत आहेत. बंगळुरूत सर्वाेत्तम अकादमी आहे.

लक्ष्मण व द्रविडसारखे दिग्गज तरुणांची मदत करत आहेत. यामुळे नवे प्रतिभावंत समोर येत आहेत. आता छोट्या शहरांतूनही प्रतिभावंत उजेडात येत आहेत. यात टीव्ही व मार्केटिंगची भूमिका मोठी आहे. भारतीय क्रिकेटचे व्यावसायिकीकरणच त्याला हिट बनवत आहे, हेही सत्य आहे.

तथापि, आयपीएलनंतर खेळ जास्त स्पर्धात्मक होत आहे. यामुळे खेळाडूंवरही दबाव वाढत आहे. मानसिक आरोग्याचेही मुद्दे समोर येत आहेत. याबाबत मोठ्या पातळीवर चर्चा होत आहे. पुढील काही वर्षांत भारतीय क्रिकेट क्रीडा मानसशास्त्रावर मोठी गुंतवणूक करेल. कारण, शेवटी क्रिकेट हा माइंड गेमच आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये मेदवेदेव हाही तगडा खेळाडू होता.

मात्र, नदाल मानसिकरीत्या जास्त मजबूत होता. क्रीडा मानसशास्त्र अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे कोणत्याही अडचणीवर मात करता येऊ शकते. यासाठी आपल्याला बेसिकपासून सुरुवात करावी लागेल. ज्युनियर लेव्हल व प्रथम श्रेणीतील खेळाडू अशाच पद्धतीने घडवावे लागतील.

यामुळे ते भविष्यातील दबावयुक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार होऊ शकतील. क्रिकेटसाठी एकमेव मोठी चिंता म्हणजे, तरुणांनी फक्त आयपीएल नव्हे तर देशासाठी खेळले पाहिजे. त्यांना वाटते की हीच एकमेव गोष्ट महत्त्वाची आहे. यासाठी ते आपले संघही सोडायला तयार असतात. ५-१० वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमधून येणाऱ्या चांगल्या प्रतिभावंतांत घट होऊ शकते. याचीच मला चिंता आहे. तसेही राष्ट्रीय संघ घडण्यासाठी वेळ लागतोच. (मदनलाल भारताचा पहिला व ५० वा वनडे खेळले. १९८३ वर्ल्ड कप, १९८५ वर्ल्ड चॅम्पियनशिप संघात होते. यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनिअर वनडेतील भारताचे पहिले सामनावीर आहेत.)

(शब्दांकन : चंद्रेश नारायणन)

बातम्या आणखी आहेत...