आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइमारतीवरून सळई पडून रिक्षातील महिलेसह बालिकेचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ बांधकाम सुरू होते. यातच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर पडली.
अपघातानंतर जोगेश्वरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोघींनाही रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. तर मुलीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये सुदैवाने रिक्षा चालक सुखरूप वाचला आहे.
एआयएम ग्रुप व मलकानी डेव्हलपर्सतर्फे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत इमारतीचं बांधकाम सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
समृद्धी महामार्गावरील मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि. बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. यात सहा जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर बहुतांश जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन-11 मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे.
हा अपघात रविवारी सकाळी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान घडला. भरधाव वेगातील इर्टिगा गाडी ही रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमध्ये घुसली व तीन ते चार पलट्या मारून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये चार जण घटनास्थळीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.