आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:2050 पर्यंत शून्य उत्सर्जनचा कृती आराखडा देणारे मुंबई दक्षिण आशियातील पहिले शहर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महापालिकेकडून मुंबई जलवायू कार्य योजना जारी

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये २०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट प्राप्त करण्याचा कृती आराखडा तयार केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई जलवायू कार्य योजना(एमसीएपी) जारी केली आहे. या अंतर्गत बीएमसी ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासोबत जल स्रोत व्यवस्थापन आणि जलवायू आव्हानांचा सामना करेल. याचा उद्देश २०५० पर्यंत शून्य कर्ब उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य केले जाईल. या कार्ययोजनेसोबत १.९० कोटी लोकसंख्येचे महानगर मुंबई शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट निश्चित करणारे द. आशियातील पहिले शहर ठरले आहे. मुंबई जलवायू कार्ययोजनेत ६ प्रमुख भागांवर लक्ष देईल. यामध्ये ऊर्जा दक्षता, शाश्वत कचरा व्यवस्थापन, हवा गुणवत्ता आणि चिरंतन गतीशिलता, शहरी पूर आणि जल स्रोत व्यवस्थापनाचा समावेश आहे.

या योजनेतून उद्दिष्टप्राप्ती
ग्रीन हाऊस गॅस घटवण्यासाठी दस्तऐवज तयार करून सार्वजनिक वाहतूक, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जाईल.
कमी अंतराच्या बिगर मोटर चलित परिवहनावर(पायी व सायकल चालवणे) भर.
वन क्षेत्राची कक्षा वाढवणे व ऊर्जा कुशल भवनांची निर्मिती.
हवामान बदल विभाग होईल.
२,१०० इलेक्ट्रिक बस १३०० कोटी रु. ते २०२३ कोटीत खरेदी होतील.

बातम्या आणखी आहेत...