आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान कोरियन महिलेचा विनयभंग:जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील खार परिसरात रात्री 8 वाजता एक कोरियन महिला लाइव्ह स्ट्रीमिंग करत होती. तेवढ्यात दोन मुले तिथे आली आणि मोडक्या-तोडक्या इंग्रजीत तिची छेड काढू लागले. एकाने महिलेचा हात धरून तिला गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला. महिलेने नकार दिल्यावर त्याने जबरदस्तीने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच मुंबई पोलिसांनी विनयभंग करणाऱ्या तरुणांना अटक केली. मुबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरियालम अन्सारी अशी त्यांची नावे आहेत.

स्वतः मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला
मुंबई पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही, परंतु त्यांनी स्वत: या घटनेची दखल घेतली आणि तपास सुरू केला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा महिलेच्या अगदी जवळ येतो. महिलेने विरोध केला तरी तो तिचा हात धरून तिला ओढण्याचा प्रयत्न करतो. ती घटनास्थळावरून पळून जाऊ लागली की, तो पुन्हा मित्रासोबत बाईकवर येतो आणि तिला लिफ्ट देण्याची ऑफर देतो. पण या महिलेने पुन्हा नकार दिला.

तात्काळ कारवाई करत खार पोलिसांनी आयपीसीच्या कलम 354 अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि दोघांना अटक केली. आरोपी मुबीन 19 तर नकीब 20 वर्षांचा आहे.

बातम्या आणखी आहेत...