आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Local Train News Updates; Western Railway Resumes Its Selected Suburban Services From Today Only For Movement Of Essential Staff As Identified By State Govt

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकल रुळावर:तीन महिन्यानंतर लोकल रुळावर, फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना करता येईल प्रवास

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल तब्बल तीन महिन्यानंतर परत रुळावर येणार आहे. लॉकडाऊनमुळे थांबलेली मुंबई हळु-हळू अनलॉक केली जात आहे, याच पार्श्वभूमिवर लोकल पुन्हा सुरू करण्यात आली आहे. परंतू, ही लोकल ट्रेनमधून पक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. आज (15 जून) पहाटे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, विरार, तर मध्य रेल्वेवरील ठाणे, सीएसएमटी यासारख्या स्थानकांवरून लोकल सुटल्या. मुंबईतील लोकल सुरु करावी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईची लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकलचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे म्हणजेच पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचारी, पत्रकार अशा काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच  करता येणार आहे. सुमारे 1.25 लाख कर्मचारी या सेवेचा लाभ घेतील. मात्र सर्वसामान्य प्रवासी या लोकलने प्रवास करू शकणार नाहीत. या रेल्वे प्रवासासाठी तिकीट काऊंटवर आधी ओळखपत्र दाखवावे लागेल, त्यानंतरच तिकीट दिलं जाईल. रेल्वे आणि राज्य सरकारकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच प्रवास करीत आहेत की नाही याची पडताळणी केली जाईल. यादरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...