आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई लोकलने केली विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा:आता 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना देखील करता येणार लोकलने प्रवास, दूरवर भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाचा धोका काही प्रमाणात मंदावला आहे. अशातच आता राज्यातील बहुतांश भागात शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहे. त्यात मुंबईतील कॉलेज देखील सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर रेल्वेने विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील कॉलेजमध्ये अकरावी आणि बारावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता कल्याण, डोंबिवली, वसई-विरार अशा लांब भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रेल्वेने दिलासा दिला आहे.

कोरोनामुळे बंद असलेली लोकल सुरु झाल्यानंतर सुरुवातीला केवळ आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची भुमा देण्यात आली होती. त्यानंतर 15 ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पुर्ण केले आहे अशा प्रवाशांना लोकल रेल्वेचे पास देखील वितरित करण्यात येत आहे.

18 वर्षांखालील मुलांनाही करता येणार लोकल प्रवास

18 वर्षांखालील मुलांना देखील आता लोकल रेल्वेने प्रवास करता येणार आहे. तर काहींना इतर आजारांमुळे लस घेणे शक्य झाले नसल्यास, अशांना देखील प्रवासासाठी तिकीट दिले जाणार आहे. त्यासाठी त्यांना आरोग्य विभागाचे प्रमाणात आवश्यक असणार आहे.

वैद्यकीय कारणांसाठी मिळणार पास

जर एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय कारणांसाठी लोकलने प्रवास करायचा आहे. आता त्याला देखील लोकलचे पास मिळणार आहे. मात्र त्यासाठी आरोग्य विभागाचे प्रमाणात बंधनकारक आहे. तसेच प्रवासादरम्यान पास आणि ओळखपत्र हे दोन्ही सोबत ठेवणे बंधनकारक असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...