आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई अनलॉक होताच अनियंत्रित गर्दी:रस्त्यांवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा, बसस्थानकावर गर्दी; मुंबईकरांकडून कोरोना नियम धाब्यावर

मुंबई14 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेची खास ड्राइव्ह

कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या दीड महिन्यापासून राज्यात कडक निर्बंध लागू केले होते. आता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करायला सुरुवात केली आहे. त्यासोबतच कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. सोमवारी मुंबई अनलॉक होताच मुंबईकर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसले. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता. यामुळे मुंबईतील इस्टर्न व वेस्टर्न एक्सप्रेस वे वर वाहनांच्या मोठ्याप्रमाणावर रांगा पहायला मिळाल्या.

कार्यालयात दाण्यासाठी लोक BEST बस स्टॉपवर रांगांमध्ये उभे असलेले दिसले. सध्या बसमध्ये जेवढे सीट आहेत तेवढेच लोक एका वेळी प्रवास करु शकतात. कोणालाही उभे राहुन जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. ठाण्यातून मुंबईला येणाऱ्या गाड्यांच्या संख्येत आज मोठी वाढ पाहायला मिळाली. ज्यामुळे मुलुंड चेक नाक्याजवळ लांब जाम होता. पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेच्या आधारावर मुंबईला कॅटेगिरी-3 मध्ये ठेवण्यात आले आहे.

मुंबईत आजपासून हे झाले सुरू

 • सकाळी 5-9 वाजेपर्यंत गार्डन
 • संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व दुकान
 • जिम, सलूनही उघडे राहू शकतात
 • BEST च्या मुंबई
 • बसमध्ये जेवढे सीट आहे तेवढ्या प्रवाशांना परवानगी
 • मेडिकल सेवा आणि आवश्यक सेवांसंबंधीत लोक लोकल ट्रेनमधून प्रवास करु शकतात
 • 50% क्षमतेच्या आधारावर रेस्तरॉमध्ये 4 वाजेपर्यंत बसून जेवण करण्याची पपरवानगी
 • खासगी कार्यालये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेसह सुरू होतील.
 • एका निश्चित क्षेत्रात शूटिंग सुरू राहिल.
 • लग्नासाठी जास्तीत जास्त 50 लोक सामिल होऊ शकतात.
 • कँपसच्या 50% क्षमतेसह सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन संध्याकाळी 4 वाजेपर्यंत केले जाऊ शकते.
 • जनरल बॉडी मीटिंग 50% क्षमतेसह होऊ शकले.
 • ई-कॉमर्स पूर्णपणे सुरू करण्यात आले आहे.
 • कंस्ट्रक्शनचे कामही आजपासून सुरू.
 • मॉल सध्या बंदच राहतील.

गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेची खास ड्राइव्ह
मुंबई लोकलमध्ये गर्दी कंट्रोल करण्यासाठी रेल्वेने सोमवारी विशेष ड्राइव्ह सुरू केली आहे. जेणेकरुन केवळ आवश्यक सेवांसंबंधीत लोकांनाच प्रवास करता येईल. मात्र अनलॉकच्या पहिल्या दिवसासारखी परिस्थिती मुंबईमध्ये पाहायला मिळाली. ज्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो.

बातम्या आणखी आहेत...