आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील परिस्थिती:रात्रीच्या लॉकडाऊनमध्ये रस्त्यांवर गर्दी; लोक म्हणतात - कोरोना कोणताही आजार नाही, सेठ सांगतात म्हणून मास्क लावतो

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भेंडी बाजार: लोक हसून मास्कच्या प्रश्नाला टाळतात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाची राजधानी मुंबईला पुन्हा एकदा ठप्प केले आहे. नियंत्रणा बाहेर गेलेला कोरोना थांबवण्यासाठी लॉकडाऊनसारखी कठोर पाऊले उचलावी लागू शकतात. हा रमजानचा काळ आहे. अशा वेळी देशात वेगवेगळ्या विभागांमध्ये मुस्लिम बहुल परिसरांमध्ये काय परिस्थिती आहे? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही ही सीरीज घेऊन आलो आहोत. सीरीजच्या पहिल्या भागात आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, मुंबईमध्ये अशा गर्दीमध्ये लॉकडाऊन आणि कोरोना गाइडलाइनचे पालन कसे होत आहे?

आमचे रिपोर्टर राजेश गाबा यांनी मुंबईच्या भेंडी बाजार आणि डोंगरीमध्ये रात्री 8:30 पासून सकाळी 8:30 पर्यंत 12 तास वेळ घालवला. जाणून घ्या या 12 तासांमधील घडामोडी...

भेंडी बाजार: लोक हसून मास्कच्या प्रश्नाला टाळतात
मुंबई सेंट्रल स्टेशन वरुन आम्ही मुस्लिम बहुल क्षेत्र भिंडी बाजार येथे पोहोचतो. रात्रीचे साडेआठ वाजले आहेत. मुख्य रस्त्यावर लॉकडाऊन दिसत आहे. तेथे शांतता आहे आणि पोलिस व्हॅन उभी आहे. येणार्‍या आणि जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जाण्याचे कारण विचारले जात आहे.

परंतु आम्ही मुख्य रस्त्यापासून भेंडीबाजारच्या रस्त्यांकडे जाताना दृश्य पूर्णपणे बदललेले दिसते. रस्ते आणि मशिदीभोवती यात्रेप्रमाणे वातावरण आहे. रात्रीचे 9: 15 वाजले आहेत, परंतु हालचाली दिवसासारख्या दिसत आहेत. खाद्यपदार्थ व पेयांची दुकाने खुली आहेत आणि लोक चौकांवर मास्कविनाच ग्रुप बनवून उभे आहेत. काही मुले अरुंद रस्त्यावर बॅडमिंटन खेळत होती. इथेही बरीच गर्दी होती. कोणाच्याच चेहऱ्यावर मास्क नव्हता. आम्ही काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु बहुतेक लोक कॅमेरा पाहून टाळण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आम्ही फारुख नावाच्या युवकाला मास्क न लावण्याविषयी विचारले तर तो म्हणाला, 'मास्कने काय होते? कुणीच लावत नाहीये'

तुझे नाव काय आहे, मास्क का नाही? उत्तर येते, 'माझे नाव नसीम आहे. मी हॉटेलमध्ये काम करतो. तिथे, जर सेठ बोलले तर मी मास्क लावतो. येथे, भेंडी बाजार, डोंगरी आणि नाला सोपारा या आमच्या भागात कधीही वापरत नाही. त्याने माझा जीव गुदमरतो. कोरोना हा आजार नाही. लोक तणावातून मरत आहेत. मी अल्लाह वाला आहे, मला काहीच होणार नाही'

भेंडीबाजारच्या सर्व मार्गांमध्ये कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती होती. छोट्या चौकात यात्रेसारखे वातावरण होते. रोजेदार हे पठानी सूट, टोपीमध्ये दिसले. परंतु, शेकडो लोकांच्या गर्दीत काही मोजकेच चेहरे दिसत होते ज्यांनी मास्क घातले होते. जणू हा विनोद असल्यासारखे हसून लोक मास्कचा प्रश्न टाळत होते.

मुंबईतील बर्‍याच भागात, BMC आणि पोलिस मास्क न वापरल्यास चालान कापत आहेत, लोकांना ताब्यात घेण्यात येत आहे, पण असे काही इथे दिसत नाही. सरकारी टीमविषयी विचारले असता लोक म्हणतात की येथे कोणी येत नाही.

या परिसरांची रिपोर्टिंग करताना गर्दी जमल्यावरुन किंवा मास्क लावण्यावरुन कुणीही सख्ती करताना दिसले नाही. एखाद्या रस्त्यावर पोलिस दिसले मात्र ते फक्त आपली ड्यूटी करत होते.

डोंगरी: रात्रीच्या जागरणासारखे वातावरण, गल्ल्यांमध्ये जमाव
भेंडीबाजार येथून आम्ही डोंगरीला पोहोचतो. मुंबईच्या लॉकडाऊनचे वेगळे चित्र येथे आहे. रात्रीचे 12:35 वाजत होते. इमाम हुसैन चौकाच्या पोलिस चौकीच्या बरोबर समोर लोक ग्रुप बनवून चहा पित होते. थोड्या अंतरावरच एका मशीदीजवळ खूप गर्दी आहे. सोशल डिस्टेंसिंग आणि मास्क सारखे कोरोना प्रोटोकॉलचे पालनही होताना दिसत नाही. एखादा पोलिस येथे दिसतो. मात्र तो कुणाला रोखत-टोकत नाही. अनेक ठिकाणी तर स्वतः पोलिसच मास्क न घालता दिसले.

एक रिपोर्टर म्हणून दादर, अंधेरी, बांद्रामध्ये फिरताना पोलिसांनी मला अनेक वेळा रोखले-टोकले आणि आयकार्ड पाहिल्यानंतर जाऊ दिले. मात्र भेंडी बाजार आणि डोंगरीमध्ये गेल्या तीन-चार तासांच्या दरम्यान एकदाही कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याने मला विचारले नाही. रमजानच्या दिवसात मुस्लिम परिसरांमध्ये जागरणासारखे वातावरण राहते. येथेही गल्ल्यांमध्ये जमाव दिसत होता. कोणालाही मास्कची चिंता नव्हती.

नंतर आम्ही सैय्यद हाजी अब्दुर रहमान शाह बाबा यांच्या दरगाहमध्ये पोहोचतो. येथे लोबानचा धूर आणि त्याचा गोड सुगंध चारही बाजूने पसरत होता. रोजेदार आणि अनेक लोक दुआ मागणे आणि डोके टेकवण्यासाठी आले होते. दर्गासमोर चहाचे हॉटेल सुरू होते आणि तिथे गर्दी दिसत होती.

स्कूटरवर बॅगमध्ये सिगारेट, बीडी आणि गुटखा विकणाऱ्या एका व्यक्तीजवळ ग्राहकांची रांग लागलेली होती. मी विचारले की, 'सध्या लॉकडाऊन सुरू आहे. तुम्हाला पोलिसांची भीती वाटत नाही का' तिकडून निष्काळजी उत्तर आले 'इकडे पोलिस येत नाही. आले तरीही फक्त फिरून जातात. त्यांना चहा-पाणी देतो.' मात्र स्वतःच्या काळजीसाठी तरी तुम्ही मास्क घालायला हवे ना? यावर हसत ते म्हणाले की, 'कोरोना वोरोना काही नाही. फक्त भास आहे. तुम्ही उगाचच मास्क घालत आहात.'

डोंगरी येथील रस्त्यांचा आढावा घेता-घेता आता सकाळचे चार वाजले होते. गर्दी रात्रीपेक्षाही जास्त वाढू लागली होती. लोक दूध-ब्रेड आणि किराण्याच्या खरेदीसाठी निघत होते. मशिदीच्या लाउडस्पीकरवर आवाज येत होते का, 'सहरीची वेळ संपण्यात केवळ 10 मिनिटे बाकी आहेत. लवकरच खाणे पिणे संपवून रोज्याची सुरुवात करा' जमावामध्ये थोड्या हालचाली जाणवल्या आणि लोक खाणे-पिणे सोडून गुळण्या करु लागले.

सकाळी 8:30 वाजेपर्यंत आम्ही अनेक भागांमध्ये फिरतो. येथे खालच्या वर्गाचे कामगार मोठ्या संख्येत राहतात. ज्यांच्यामध्ये कोरोनाविषयी अवेअरनेसचे प्रमाण खूप कमी आहे. टेस्टिंग आणि अवेअरनेस पसरवणाऱ्या सरकारी टीमही या भागांमध्ये कमी येतात. मात्र जर कोरोनाची साखळी तोडायची असेल तर या भागांमध्येही मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रॅसिंगवर लक्ष द्यावे लागेल.

गर्दीच्या ठिकाणी अनेक पटींनी पसरतो कोरोना, कुंभाचे उदाहरण
गर्दी आणि मास्क न लावल्याने कोरोना झपाट्याने पसरतो, हे कुंभाच्या उदाहरणावरुन समजू शकते. कुंभादरम्यान उत्तराखंडमध्ये एका महिन्याच्या आतच कोरोना रुग्ण आढळण्याचा वेग 8814% वाढला होता. 14 फेब्रुवारीपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत उत्तराखंडमध्ये केवळ 172 लोक संक्रमित झाले होते. नंतर 1 ते 15 एप्रिल या काळात 15,333 लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले. 14 फेब्रुवारीपासून 14 एप्रिलच्या काळात ग्रोथ रेट 8814% येतो. महाराष्ट्र देशात कोरोनाचा सर्वात जास्त प्रकोप असणारे राज्य आहे. सध्या राज्यात 6.76 लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकट्या मुंबईमध्ये सध्या कोरोनाचे 85321 अॅक्टिव्ह केस आहेत. मुंबईजवळील वसईमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 60% वर पोहोचला आहे. म्हणजेच टेस्ट करणाऱ्या 100 लोकांमधून 60 पॉझिटिव्ह निघत आहेत.

बातम्या आणखी आहेत...