आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लूटण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद:कुर्ला रेल्वे स्टेशनवर 2 लाख लुटण्यासाठी एका व्यक्तीवर दिवसा-ढवळ्या चाकूने हल्ला, पोट आणि छातीवर केले वार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जखमी असूनही पैश्यांची बॅग सोडली नाही

शनिवारी मुंबईच्या कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फूटओव्हर ब्रिजवर दरोड्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला. आज त्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या हल्ल्यात फैयाज नेमपूरवाला नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. बीएमसी रुग्णालयात तो अजूनही व्हेंटिलेटरवर आहे. तो घरी परत जात असताना फैयाजवर हल्ला झाला आणि त्याच्याकडे बँकेतून काढण्यात आलेले तीन लाख रुपये काढून घेण्यात आले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी असूनही आरोपी त्यांच्याकडून पैसे हिसकावण्यात अपयशी ठरले.

जखमी असूनही पैश्यांची बॅग सोडली नाही

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फैयाज अद्याप जबाब करण्याच्या स्थितीत नाही. जीआरपी पोलिस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैयाज कुरिअर कंपनीत काम करतो आणि मुंब्रा येथे आपल्या पत्नीसमवेत राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. शनिवारी नेमपूरवाला ऑफिसच्या कामाने कुर्ला (पूर्व) येथील कसईवाडा येथे आले होते. परत जात असताना ते कुर्ला स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 8 शी जोडणार्‍या पुलाकडे जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोर मागून आला आणि त्यांच्या छाती आणि पोटात चाकूने वार केला.

कोणीही केला नाही वाचवण्याचा प्रयत्न

हल्ल्यादरम्यान पुलावर बरेच लोक हजर होते, पण कोणीही फैयाजला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, नंतर काही लोकांनी प्रथम स्टेशन मास्टरला आणि त्यानंतर जीआरपीला माहिती दिली. मात्र, ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी पळून गेले होते. नेमपूरवाला बराच काळ रक्ताने माखलेल्या अवस्थेत पुलावर पडून होते. जीआरपीच्या लोकांनीच त्यांना रुग्णालयात आणले. फेस मास्कमुळे आरोपीची ओळख पटली नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser