आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा उद्रेक:मुंबईच्या भायखळा तुरुंगात गेल्या 10 दिवसांमध्ये 39 कैदी कोरोना पॉझिटिव्ह, गरोदर महिला कैदीला रुग्णालयात केले दाखल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांना एका शाळेतील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

मुंबईच्या भायखळा तुरुंगात गेल्या 10 दिवसांमध्ये 6 बालसांसह 39 कैदी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या सर्वांना आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. 120 कैदी आणि तुरुंगातील कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट झाली. एका गरोदर महिला कैदीला खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने शनिवारी भायखळा महिला कारागृहात 39 कैद्यांना करोनाची लागण झाल्यानंतर सील केले.

कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांना एका शाळेतील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर त्यातील वरिष्ठ नागरिकांना रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. 17 सप्टेंबर रोजी स्थानिक आरोग्य विभागाला कारागृहात अनेक रुग्णांना ताप येत असल्याची माहिती देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात तुरुंगात जवळपास 120 कैद्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर 39 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासोबतच ज्या कैद्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कैद्यांना देखील उपचार दिले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...