आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai (Maharashtra) Coronavirus Cases 29 MARCH Update | Maharashtra Corona Cases District Wise Today News; Mumbai Pune Thane Aurangabad Latur Nanded Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात लवकरच लॉकडाऊन 2.0:हिंगोलीत आजपासून 7 सात दिवसांचा कडक लॉकडाऊन; बीडमध्ये 80 वर्षांत पहिल्यादांचा 'गाढवाची मिरवणूक' रद्द

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात गेल्या चोवीस तासात आढळले 40,414 रुग्ण

कोरोना संक्रमनामुळे महाराष्ट्रात राज्यात नवीन सक्रीय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात 40 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. हा आकडा गेल्या आठवड्यापासून सलग वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चिंतेच वातावरण तयार झाला आहे. यामुळे कोरोनावर बनवलेल्या टास्क फोर्सने मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना राज्यात लॉकडाऊन करण्याची शिफारस केली आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांने सांगितले की, राज्यात कलम 144 किंवा कर्फ्यूने हे काम भागणार नसून यासाठी लॉकडाऊन हा एकमात्र पर्याय असल्याचे म्हटले होते आणि संबंधित विभागाला मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशदेखील दिले आहे. यामुळे येत्या एक दोन दिवसात संपूर्ण राज्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रविवारी झालेल्या टास्‍क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गरज पडल्यावर बेड्स संख्या, ऑक्सीजनची उपलब्धता आण‍ि व्हेंटिलेटरचा आढावा घेतला होता. आणि संबंधित विभागाला तसे आदेश दिली होते.

बीडमध्ये रद्द झाली 'गाढवाची मिरवणूक'
कोरोना वाढत्या संक्रमनामुळे बीडमध्ये होळीनिमित्त होणारी गाढवाची मिरवणूक 80 वर्षात पहिल्यांदा रद्द करण्यात आली आहे. या मिरवणुकीमध्ये गाढवाला रंगवून त्याच्या गळ्यामध्ये चप्पलाची हार घालून त्यावर एका माणसाला बसवले जाते आणि संपूर्ण गावात त्याची मिरवणूक काढली जाते. गाढवावर बसणार्‍या व्यक्तीना बक्षिस म्हणून सोन्याची अंगूठी आणि एक नवीन कपड्याचा ड्रेस प्रदान केला जातो. परंतु, जिल्हाधिकार्‍यांनी गावकरर्‍यांच्या विनंतीनंतरही तो कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले.

हिंगोलीमध्ये 7 सात दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन
राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागायच्या आधी हिंगोली जिल्हाधिकार्‍यांनी एक आठवड्यासाठी लॉकडाऊन घोषीत केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता बाकी सर्व बंद राहणार आहे. जिल्हात 29 मार्चच्या सकाळी 7 पासून 4 एप्रिलच्या दुपारी 12 वाजेपर्यंत राहणार आहे.

30 मार्चपासून औरंगाबाद जिल्हात लॉकडाउन
औरंगाबाद स्थानिक प्रशासनाने 30 मार्चच्या मध्यरात्रीपासून 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची जाहीर केला आहे. जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासात आढळले 40,414 रुग्ण
महाराष्ट्रात वाढत चाललेला कोरोना संसर्ग रविवारीही कायम होता. प्रशासकीय पातळीवर हा संसर्ग थोपवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असले तरी कोरोना रुग्णांची संख्या मात्र अजूनही आटोक्यात आलेली नाही. संसर्गाच्या नव्या लाटेत रविवारी विक्रमी 40,114 रुग्ण आढळले, तर 108 जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्युदर 2% झाला असून रविवारी 17,874 रुग्ण बरे होऊन परतले. हा रिकव्हरी रेट 85.95% झाला आहे.

एकूण आकडेवारी पाहता राज्यात एकूण 27,13,875 नमुने पॉझिटिव्ह आले असून 15,56,476 होम क्वॉरंटाइन आहेत.

बातम्या आणखी आहेत...