आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना काळात कठोर नियम:मुंबईमध्ये विना मास्क फिरणाऱ्या 20 हजार लोकांना दररोज आकारला जाईल दंड, पहिल्याच दिवशी पकडले गेले फक्त 4 हजार 300 लोक

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउननंतर एप्रिलपासून आतापर्यंत बीएमसीने मास्क न घालणाऱ्यांकडून 1 कोटी 5 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे
  • बीएमसीचे आयुक्त इबाल सिंह चहल यांनी म्हटले की, हे अभियान जवळपास एक महिना चालेल, यामध्ये 200 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे

मुंबईमध्ये कोरोनावर आळा घालण्यासाठी आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिका (बीएमसी)ने रोज 20 हजार लोकांना दंडित करण्याची तयारी सुरू केली आहे. याची सुरुवात सोमवारपासून पूर्ण मुंबईत झाली आणि पहिल्या दिवशी केवळ 4 हजार 300 लोकांना विना मास्कचे पकडण्यात आले आणि प्रत्येक व्यक्तीकडून 200 रुपयांचा दंड आकारण्यात आला.

पहिल्यादिवशी वसूल करण्यात आले 60 हजार रुपये
सोमवारी एकूण 8 लाख 60 हजार दंड आकारण्यात आला, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. एप्रिलपासून बीएमसीने 1 कोटी 5 लाख रुपयांचा दंड मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला आहे. या कालावधीत एकूण 38,866 लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे. दंड वसूल करण्यासाठी, महापालिकेने 980 लोकांची एक खास टीम तयार केली आहे, जे शहरभर फिरतील.

ही मोहीम महिनाभर चालणार आहे
पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले की ही मोहीम सुमारे एक महिना चालणार आहे. ते म्हणाले की ते रोज परिस्थितीचा आढावा घेतील. चहल म्हणाले, "एमसीजीएम अंतर्गत मोठ्या संख्येने लोक मास्क घालत नाहीत आणि यामुळे भविष्यात परिस्थिती अधिकच बिघडू शकते, ज्यामुळे मुंबई उघडण्यास आणखी विलंब होईल,"

पुढे चहल म्हणाले की, 'एमसीजीएम मास्क न घालणाऱ्या लोकांना शिक्षा देण्यासाठी रोज जवळपास 20 हजार नागरिकांना शिक्षा देण्याचे व्यापक अभियान सुरू करणार आहे. एप्रिल 2020 पासून सार्वजनिक स्थळांवर मास्क न घालणाऱ्या लोकांसाठी 200 रुपये दंड ठोठावण्यात येईल असे ठरले आहे.'

राज्यात एकूण 15 लाख 35 हजार संक्रमित रुग्ण
महाराष्ट्रात सोमवारी कोविड-19 चे 7,089 नवीन प्रकरणे समोर आले. यानंतर एकूण संक्रमितांचा आकडा वाढून 15,35,315 झाला आहे. राज्य आरोग्य विभागाने सांगितले की, संक्रमणामुळे 165 मृत्यू झाला, यानंतर मृतांची संख्या वाढून 40,514 झाली आहे. विभागाने सांगितले की, गेल्या 48 तासांमध्ये 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 21 लोकांचा मृत्यू गेल्या आठवड्यात झाला होता आणि इतर 44 लोकांचा मृत्यू गेल्या आठवड्यापूर्वी झाला होता.

सोमवारी उपचारांनंतर 15,656 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. यानंतर बरे होणाऱ्या लोकांची संख्या वाढून 12,81,896 झाली आहे. राज्यात आता 2,12,439 रुग्णांवर उपचार सुरू आहे.