आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai (Maharashtra) Rain News | Maharashtra Weather Forecast Status Today Latest News Updates; IMD Orange Alert In Mumbai, Raigad, Ratnagiri, Sindhudurg

मानसून अपडेट:मुंबईसह उपनगरात सकाळपासून तुफान पाऊस; पुढचे दोन दिवस मुंबई-कोकणात अतिवृष्टीचा अंदाज

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईसह उपनगरात सकाळपासून तुफान पाऊस कोसळत आहे. पावसामुळे दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरात गुडघाभर पाणी तुंबले आहे. पुढील दोन दिवस मुंबई, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यासारख्या कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे.  मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहेत. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली , विले पार्ले आणि सांताक्रूजमध्ये वेस्टर्न एक्सप्रेसवेवर मोठा ट्रॅफिक जॅम झाला. मुंबईच्या किंग सर्कल, विले पार्ले, कांदिवली, बोरीवली, दादर, मालाड, गोरेगाव आणि सांताक्रूज भागांमध्ये सकाळपासून पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत आहे.

113 टक्के नालेसफाई झाल्याचे दावे करणारे कुठे आहेत? - आशिष शेलार

मुंबईसह उपनगरातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आशिष शेलारांनी  शिवसेना आणि महापालिकेवर घणाघात केला आहे. “मुंबईत 113 टक्के नालेसफाई झाल्याच्या आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने अखेर तीन तेरा वाजवलेच! हे होणारच होते, कारण 40 टक्क्यांपेक्षा जास्त नालेसफाई झालेली नाही,” असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभाग आयएमडीने मुंबई, ठाणे, पालघर आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात सुद्धा मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

200 मीटर पावसाची शक्यता

औरंगाबाद, जालना, कोल्हापूर आणि सातारा येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक केएस होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ऑरेंज आणि यलो अलर्ट मंगळवारी आणि बुधवारकरिता मराठवाडा आणि कोकण विभागासाठी जारी करण्यात आले आहेत." मुंबईत 200 मिलीमिटर पावसाचा अंदाजही त्यांनी यावेळी वर्तवला आहे.

गेल्या 24 तासात बुधवारी सकाळपर्यंत डहाणूमध्ये 128 मिलीमिटर, कुलाबा येथे 121.6 मिलीमिटर, सांताक्रूज येथे 96.6 मिलीमिटर, रत्नागिरीत 101.3 आणि अलीबागेत 122.6 मिमी पाऊस पडला आहे.