आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Maharashtra । Shiv Sena । Sanjay Raut । Prime Minister Narendra Modi । 2024 General Elections । Saamana । Municipal Elections; News And Live Updates

शिवसेनेच्या मुखपत्रात मोदींची स्तुती:मोदी भाजपचा खरा चेहरा; बंगाल, तामिळनाडू आणि केरळमधील पराभवासाठी अमित शहा जबाबदार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पराभवाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न - संजय राऊतांचा दावा

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठ्या प्रमाणात स्तुतीसुमने करण्यात आली आहे. सामनाने मोदी यांना भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा असल्याचे वर्णन केले आहे. मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून अतिशय धाडसी पावले उचलली असून ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीची चांगली तयारी करत असल्याचे लेखात म्हटले आहे.

तर दुसरीकडे, या लेखामध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. बंगाल, तामिळनाडू आणि केरळमधील पराभवासाठी गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून गेल्या 25 वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही अंतर ठेवण्यात अमित शहाचा हात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

मोदींशिवाय भाजपमध्ये मजबूत नेते नाहीत
सामनाने पुढे म्हटले की, भारतीय जनता पक्षात पंतप्रधान मोदी यांच्यावितिरिक्त इतर मजबूत नेते नाहीत. मोदी यांच्याशिवाय इतर अनेक मोठे नेते महानगर पालिका निवडणूक देखील जिंकू शकत नाही असा घणाघात सामनामध्ये करण्यात आला आहे. जेंव्हापासून जे पी नड्डा यांच्याकडे भाजपचे सूत्र आले आहे, तेंव्हापासून सातत्याने पक्षात बदल होत आहे.

मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय चांगला
पंतप्रधान मोदी आणि नड्डा योग्य निर्णय घेऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. दोघांनी तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलले असून मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय चांगला असल्याचे लेखात म्हटले आहे. गुजरातमध्ये भाजपने जुनी झाडे उखडून टाकत नवीन बिया पेरल्या. मध्य प्रदेश, हरियाणा आणि हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांवरही मोदी आणि नड्डा यांचे लक्ष असल्याचे लेखात म्हटले गेले आहे.

पराभवाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न - संजय राऊतांचा दावा
भाजप पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्राचा पराभव दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लेखात केला आहे. अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करत राऊत म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अमित शहा कोणतीही निवडणूक जिंकू शकतात अशी मोहीम चालवली जात होती. परंतु, त्यांच्या कार्यकाळात भाजपने शिवसेनेसारखा 25 वर्षांचा मित्रपक्ष गमावला आणि पक्ष पराभूत झाला. आता विरोधी पक्षात बसून काम पाहावे लागत आहे अशी टीकाही राऊतांनी लेखात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...