आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निकाहाच्या नावावर धोका:मुंबई माहिम दर्ग्याचे ट्रस्टी निसार यांच्यावर बलात्काराचा आरोप, पीडिता म्हणाली - बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन केला बलात्कार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडितेच्या तक्रारीवरून निसार यांच्यावर कलम 376, 328 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबईतील प्रसिद्ध माहिम दर्ग्याचे ट्रस्टी आणि वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुदस्सिर निसार यांच्याविरोधात माहिम पोलीस ठाण्यात कथित बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून निसार यांच्यावर कलम 376, 328 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिस त्यांना अटक करू शकले नाहीत.

सुमारे एक महिन्यानंतर तक्रार दाखल केली

माहिम पोलिस ठाण्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता एक सामाजिक कार्यकर्ती आहे. डॉ. निसार यांनी खोटे बोलून लग्नाचे आश्वासन दिले आणि नंतर बलात्कार केला. 7 डिसेंबर रोजी पीडित महिलेने माहीम पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली, त्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर मुदस्सिर यांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बलात्कार केल्याचा आरोप पीडिताने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.

मुंबई पोलिस अटक टाळत आहेत

डॉ. मुदस्सिर निसार हे महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे सक्रिय सदस्य आणि माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. धार्मिक ट्रस्टशी संबंधित असल्यामुळे पोलिस सध्या त्यांना अटक करण्यापासून बचाव करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...