आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत 1 तरुण 2 तरुणींसोबत बाइकवर धोकादायक स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी रविवारी 2 तरुणी आणि तरुणाविरोधात बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
स्टंट करणाऱ्यास अटक
धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाण वाढत आहे. दोन महिलांसोबत केलेल्या धोकादायक बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. दोन महिलांसह केलेल्या धोकादायक बाईक स्टंटचा तेरा सेकंदाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, मुंबई पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणारा स्टंटबाजला बीकेसी पोलिसांनी अटक केली असून आरोपीचे नाव फैय्याज अहमद आजीमुल्ला कादरी (24) असे आहे.
यापूर्वी देखील गुन्हे दाखल
फैय्याज अहमद आजीमुल्ला कादरीवर यापूर्वी देखील अँटॉपहिल, वडाळा टीटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर यापूर्वी त्याला तडीपार देखील करण्यात आले होते. बीकेसी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात कलम 308, 279, 336, 34, 114 भादविसह 184, 196 माटार वाहन कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
व्हिडिओत नेमके काय?
या व्हिडिओमध्ये एका दुचाकीवर एक तरुण आणि दोन तरुणी बसलेले दिसून येत आहे. मुलाच्या समोर एक तर मागे एक तरुणी बसलेली असून पुढील चाक उचलत काही मीटरपर्यंत गाडी चालवताना या मुलीं हसताना आणि हातवारे करताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यात तिघांनीही हेल्मेट घातलेले दिसून येत नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने तो त्यांचे राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती घेत सापळा रचत त्यांला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक शैलेंद्र जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक विशाल पालांडे, सहायक पोलिस निरीक्षक आनंद पवार, पोलिस उपनिरीक्षक सुशांत पाटील यांच्या पथकाने केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.