आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबईत पाऊस:दुपारी 2 वाजता समुद्रामध्ये भरतीचा धोका, 4.6 मीटर उंच लाटा उसळू शकतात; शहरातील अनेक भागात पावसाचा जोर कायम

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धोका लक्षात घेता बीएमसीने लोकांना समुद्रकिनार्‍यापासून दूर राहण्याचा दिला सल्ला

मुंबईच्या अनेक भागांत गुरुवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. मात्र या पावसामुळे येथील रहिवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज दुपारी 2 वाजेसाठी समुद्रात 4.66 मीटर उंच भरतीचा इशारा दिला आहे. धोका लक्षात घेता बीएमसीने लोकांना समुद्रकिनार्‍यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांची पथके सकाळपासूनच संपूर्ण समुद्राच्या भागावर नजर ठेवून आहेत. आज सकाळपासूनच मुंबईच्या वांद्रे, वरळी, महालक्ष्मी, मीरा रोड, भायंदर, दहिसर, मजगाव आणि नवी मुंबई परिसरात पावसाने हजेरी लावली. जर पाऊस वाढला तर येथे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

येत्या 24 तासांत देशाच्या या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे

पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, झारखंड, छत्तीसगड, दक्षिण मध्यप्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात हलत्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहेत. या भागातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. पश्चिम हिमालय, उत्तर प्रदेश, ओडिशा, उत्तर तटीय आंध्र प्रदेश आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 

यासह तेलंगाणा, कर्नाटकचा किनारी प्रदेश, केरळच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे, कोकण गोवा, गुजरात, दक्षिणपूर्व आणि उत्तर राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली येथे हलका ते मध्यम पाऊस पडेल. तामिळनाडूमध्ये एक-दोन ठिकाणीही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.