आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai | Marathi Language | Marathi News | Marathi Language Should Get 'elite' Status; Congress State President Nana Patole's Letter To The President And Prime Minister

मराठी ही लोकभाषा:मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळावा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे राष्ट्रपती व पंतप्रधानांना पत्र

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी जवळपास गेल्या दशकभरापासून या निर्णयाची प्रतिक्षा महाराष्ट्रातील तमाम जनतेला आहे. काही दिवसांवर मराठी दिवस ठेपले असताना आता पून्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा. यासाठीची मागणी होत आहे. त्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते केंद्रावर दबाव टाकण्यासाठी हालाचाली देखील करताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत एक पत्र लिहले आहे.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा व लोकभाषा आहे. मराठी भाषेचे स्वतंत्र व्याकरण, लिपी व विपुल साहित्य संपदाही आहे. जगात दहावी व देशात तिसऱ्या क्रमांकाची मराठी भाषा असून मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या 10 कोटी आहे. प्राचीन शिलालेखावरही मराठी भाषेचा उल्लेख आढळतो. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी असलेल्या सर्व निकषांना मराठी भाषा पात्र ठरत असल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्र पाठवून केली आहे.

पुढे पत्रात पटोले म्हणतात की, मराठी भाषा प्राचीन भाषा असून तिसऱ्या शतकातील सातवाहन राजवटीतील घारापुरी लेण्यांमध्ये सापडलेल्या नाण्यांवर मराठीचा उल्लेख आढळतो. सहाव्या शतकात राजा हाल लिखित 'गाथा सप्तशती' लिहीला तर 12 व्या शतकात मुकुंदराज या कवीने 'विवेकसिंधू' या काव्यग्रंथाची निर्मिती मराठी भाषेत केली. प्राचीन काळातील अनेक शिलालेखावरही मराठी भाषेचा उल्लेख आढळून आलेला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गोवा, गुजरात या राज्यात तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, न्युझीलंडसह विविध देशात मराठी बोलणारे असंख्य लोक आहेत. अमेरिकेच्या 23 विद्यापिठांमध्येही मराठी भाषा शिकवली जाते. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी असेलले सर्व निकष मराठी भाषेत असल्याने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. अशा मागणीचे पत्र नाना पटोले यांनी राष्ट्रपतींना पाठवले आहे.

बातम्या आणखी आहेत...