आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्क न घालणार्‍यांवर कठोर कारवाई:मुंबईत 27.59 लाख लोकांना विनामास्क फिरताना पकडले, त्यांच्याकडुन 55 कोटी रुपयांचे दंड केले वसूल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिसांनी 6.77 कोटींचा दंड वसूल केला

राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी 31 मे पर्यंत लॉकडाउन केला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील कोरोनाची साखळी तोडण्याकरीता मुंबई महानगर पालिका, मुंबई पोलिस आणि रेल्वे विभाग रस्त्यावर अनावश्यकपणे आणि विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहे. मुंबईत 27.59 लाख लोकांना विनामास्क फिरताना पकडले असून त्यांच्याकडुन 55 कोटी रुपयांचे दंड केले वसूल केले असल्याचे महानगर पालिकेने म्हटले आहे. यापूर्वी विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून 200 रुपये वसूल करण्यात येत होते. परंतु, आता यामध्ये वाढ करत आता प्रति व्यक्ती 500 केले आहे.

418 दिवसात 55.56 कोटी रुपयांचा दंड वसूल
मुंबईत 20 एप्रिलपासून तर आतापर्यंत म्हणजेच गेल्या 418 दिवसात 27.59 लाख लोकांकडून 55.56 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये सर्वात जास्त दंड महानगर पालिकेने वसूल केले आहे. त्यांनी गेल्या 418 दिवसात 23.96 लाख लोकांकडून 48.29 कोटी रुपये वसूल केले आहे.

मुंबई पोलिसांनी 6.77 कोटींचा दंड वसूल केला
मुंबईत विनामास्क फिरणाऱ्या एकूण 55.56 कोटी आकडेवारीपैकी मुंबई पोलिसांनी 3.39 लाख लोकांना पकडले असून त्यांना 6.77 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे हार्बर रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर 23 हजार 891 लोकांना विनामास्क फिरताना पकडले. त्यांच्याकडून 50.39 लाख रुपयांचे दंड वसूल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...