आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री कंगना रनोटवर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर आज मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली होती असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. तसेच कंगनाला पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे. आता यावरुन भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुंबई पालिका आणि संजय राऊतांवर टीका केली आहे.
उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सोमय्या यांनी, 'कंगना रनोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुंबईच्या महापौरांनी आणि पालिका आयुक्तांनी आता राजीनामा द्यायला पाहिजे. संजय राऊतांची तर बोलतीच बंद झाली आहे' असे म्हणत टोला लगावला आहे.
V welcome Highcourt Order on #KanganaRanaut demolition case. Mumbai Mayor & BMC Commissioner should Resign. #SanjayRaut ki Bolti Bandh Ho Gayi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/DhWqQsZ6QI
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 27, 2020
महापालिकेने कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील बांधकाम अनधिकृत असल्याचे ठरवत कारवाई केली होती. यानंतर कंगनाने संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप केला आणि मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. नंतर कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. त्यानंतर महापालिकेने कारवाई केली. ही कारवाई आपल्या वक्तव्याविरोधात आहे असे म्हणत कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज न्यायालयाचा निकाल आला आहे. या निर्णयानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या निकालामुळे आता संजय राऊतांची बोलती बंद झाली आहे असा टोला लगावला आहे.
न्यायालयाने काय म्हटले?
मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगना रनोटच्या बंगल्यावर झालेली कारवाई बेकायदा होती असे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, कंगनाला ही कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मदत सुद्धा मिळू नये असे प्रयत्न झाले. मुळात बीएमसीने (बृहन्मुंबई महापालिका) कंगनाच्या बंगल्यावर कारवाईसाठी जी नोटिस बजावली होती तीच हायकोर्टाने रद्दबातल ठरवली. ही कारवाई कंगनाच्या सोशल मीडियावर झालेल्या कॉमेंट्सवरून झाली असावी असेही कोर्टाने म्हटले. सोबतच, कंगनाला सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या विधानांवर संयम बाळगण्याची ताकीद दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.