आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई तुंबली:'पावसाचे पाणी शहरात भरणारच नाही असा दावा कोणीही कधीच केला नव्हता' - किशोरी पेडणेकर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिले चार-पाच दिवस मुंबई ठप्प राहायची, पण आता...

मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे येथील ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नाही. मात्र, चार तासात निचरा झाला नाही तर मात्र आरोप योग्य आहे. असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केले आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, 'पावसाचे पाणी शहरात भरणारच नाही असा दावा कोणीही कधीच केलेला नव्हता. समुद्राचे दरवाजे बंद, सतत पाऊस सुरू आहे यामुळे मुंबईत पाणी भरणारच होते, तसेच पुण्यामध्येही पाणी तुंबले आहे. मात्र चार तासाच्या वर शहरात तुंबून राहत नाही. आताही अनेक भागांमधील पाण्याचा निचरा झालेला आहे.'

पहिले चार-पाच दिवस मुंबई ठप्प राहायची, पण आता...
मुंबईतील तुंबणाऱ्या पावसाविषयी किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, 'पहिले पावसाचे पाणी तुंबले तर चार- पाच दिवस मुंबई ठप्प झालेली राहायची. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही मुंबईतल्या सर्व भागांवर लक्ष ठेवत आहोत. ज्या ठिकाणी निष्काळजीपणा दिसेल तिथे तात्काळ कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षीपासून मनुष्यबळ विस्कळीत झालं आहे. मात्र हे कारण आम्ही देणार नाही. मुंबईत चार तासांहून अधिक काळ पाणी साचणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेणार असल्याचेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...