आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या महापौरांची टीका:प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी बनणाऱ्या नटीला पद्मश्री देणे अखंड हिंदुस्थानचा अपमान, तर गोखलेंनी काहीही सुचवावे हे चालणार नाही - किशोरी पेडणेकर

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कंगना रनोट हिला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान तिने देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील तिच्यावर निशाणा साधला आहे. प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री पुरस्कार देणे हा अखंड हिंदुस्थानचा अपमान असल्याचे पेडणेकर म्हणाल्या.

कंगनाने भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. '1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले' असे कंगना म्हणाली होती, यावरुन तिच्यावर टीका केली जात आहे. तिच्या या वक्तव्याचा किशोरी पेडणेकरांनी समाचार घेतला आहे. तसेच तिला मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारावरुनही तिच्यावर टीका केली आहे. पेडणेकर म्हणाल्या की, 'प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री पुरस्कार देणे हा अखंड हिंदुस्थानचा अपमान आहे. तिच्यावर कारवाई करून विषय संपवा, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारला केली. तसेच कंगना दर तीन महिन्यांनी प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करते. ती जन्मली कुठे, रोजीरोटी कमवायला कुठे आली आणि इथे येऊन माझ्या मुंबईची आणि महाराष्ट्राची पाकिस्तानशी बरोबरी करतेय, अशा शब्दांत त्यांनी कंगनाला रनोटला फटकारले आहे.'

अभिनेते विक्रम गोखलेंवरही केली टीका
अभिनेते विक्रम गोखलेंनी शिवसेना आणि भाजपने एकत्र यायला हवे असे म्हटले होते. तसेच ते एकत्र यावे म्हणून माझे प्रयत्न सुरू आहे असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, गोखले हे मानाने, सन्मानाने मोठे आहेत. मात्र त्यांनी काहीही सूचवावे असे चालणार नाही. गोखले बुद्धिजीवी आहेत असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

बातम्या आणखी आहेत...