आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंना टोला:बाळासाहेबांनी अनेकांना घडवले, पण हे कसे बिघडले? मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरेंवर शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. यातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर अगदी खालच्या शब्दांत टीका केली आहे. बाळासाहेबांनी अनेकांना घडवले, त्यांच्यामध्ये हे सुद्धा घडले होते. परंतु हे कसे काय बिघडले असा खोचक सवाल पेडणेकर यांनी केला आहे. यासाबतच बऱ्याच मनसेसैनिकांनी आमच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. असेही पेडणेकर म्हणाल्या. दोन वर्षांपासून मोरी तुंबलेली होती, काही तरी बाहेर निघेल असे वाटले होते, पण तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडुळ बाहेर निघाले, अशी विषारी टीका पेडणेकर यांनी केली आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर या शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी राज ठाकरे यांच्या भाषणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन केले, येत्या काही काळात मेट्रोचे उद्घाटन करतील, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. यावेळी बोलताना सर्व भाजपचे स्क्रिप्ट होते, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दलचा द्वेष यातून दिसून येत होता. यासाठीच राज ठाकरेंनी पक्ष सुरू केला की काय असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.

बाळासाहेबांचे उत्तराधिकारी उद्धव ठाकरेंच - पेडणेकर
घरच्यांचा पण द्वेष इतका असावा का, तुझे माझे पटत नाही, असे महिला प्रमाणे राज ठाकरे वागत आहे. भाजप मांडीवर ही घेत नाही आणि हे म्हणताय मला घ्या ना, असे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. मुंबईत शिवसेनेचा द्वेष करून आतापर्यंत कुणी मोठे झाले नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे असे म्हणत मनसेला इशारा दिला आहे. शिवसेना भवनासमोरील बॅनरवरून देखील पेडणेकर यांनी टीका केली आहे. यावर बोलताना त्यांनी बाळासाहेबांचा उत्तराधिकारी हे केवळ उद्धव ठाकरे आहेत. जनतेलाही तसेच वाटते. डुबलिकेट लोक उत्तराधिकारी होत नाही, 2 वर्षे यांची मोरी तुंबली. त्या काळात आम्ही काम केले. कायद्याची आणि कायद्याची लढाई ही सुरू आहे. ईडीची नोटीस आल्यावर अनेकांची भूमिका बदलली. मनसे ही भाजपची बी कंपनी आहे, अशी टीकाही पेडणेकर यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...