आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचे थैमान:मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, 'पण कुठेतरी आभाळ फाटलं... ' ट्विटरवर पोस्ट केली कविता

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महापौर किशोरी पेडणकेर यांचे मोठे भाऊ सुनील कदम यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून मुंबईच्या नायर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सुनिल कदम असं त्यांच्या मोठ्या भावाचं नाव होतं. त्यांच्या आठवणीत किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवर कविता पोस्ट केली आहे.

किशोरी पेडणेकर यांनी एक भावूक पोस्ट करत लिहिले की, 'माझा भाऊ सुनील कदम यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, त्यांच्या कुटुंबियांना याा दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच भगवान चरणी प्रार्थना..' यासोबतच एक कविताही शेअर केली आहे.

दरम्यान देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यातही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 14,994 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...