आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील घटना:कौटुंबिक वादानंतर रेल्वे ट्रॅकवरील इलेक्ट्रिक पोलवर चढली व्यक्ती, जीव वाचवण्यासाठी करत राहिला प्रयत्न

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मदनपुरा परिसरात राहणारा शेख घरी झालेल्या वादानंतर रविवारी भायखळा रेल्वे स्टेशनजवळील हायटेंशन रेल्वे ट्रॅकवर पोहोचला

मुंबईमध्ये मानसिकरित्या त्रस्त असेलला एका व्यक्ती ट्रॅकवरील हायटेंशन वायरच्या पोलवर चढला. थोडा वे तो पोललाच लटकला आणि झुलत राहिला. नंतर विजेचा झटका बसल्यानंतर ट्रॅकवर खाली पडला. सध्या त्याच्यावर मुंबईच्या एका सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी म्हटले की, विजेचा धक्का बसल्याने व्यक्तीला गंभीर इजा झाली आहे.

कौटुंबिक वादानंतर उचलले पाऊल
मानसिकरित्या आजारी असलेल्या या व्यक्तीचे शाकिर शेख (31) आहे. मदनपुरा परिसरात राहणारा शेख घरी झालेल्या वादानंतर रविवारी भायखळा रेल्वे स्टेशनजवळील हायटेंशन रेल्वे ट्रॅकवर पोहोचला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस योग्य वेळी पोहोचले होते. पण पोलवर चढून त्याला खाली उतरवण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही.

दरम्यान, जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये शाकिर सतत वायरपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये घेतला आणि सोशल मीडियावर टाकला.