आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा1 मे म्हणजेच आजपासून मुंबई मेट्रोत सवलत देण्याचा शासन निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. 65 वर्षांवरील नागरिक, 'दिव्यांग' व्यक्ती आणि इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मेट्रोच्या तिकीट दरांत 25 टक्के सवलत मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी याबाबत घोषणा केली. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
1 मे महाराष्ट्र दिनी 65 वर्षांवरील नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मुंबई मेट्रोच्या प्रवासातील सवलतीची भेट मिळाली आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून हा निर्णय पारित करण्यात आला.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मेट्रो लाइन 2A आणि 7 या तिकिट खिडक्यांवर तिकीट काढता येईल. मेट्रो 2 अ दहिसर पूर्व आणि अंधेरी पश्चिम मधील डीएन नगरला जोडते, तर लाईन 7 अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व दरम्यान धावते. या तिन्ही श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी वय प्रमाणपत्र आणि विद्यार्थ्यांनी शाळेचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे, रेल्वे प्रशासनाने याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे. त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे. तर महिलांनासुद्धा एसटी बसेसमधून 50 टक्के तिकीट दरांत सवलत दिली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.