आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Migrants Workers Update | Mumbai Bandra Station Shramik Special Train Tickets Registration News Updates On Stranded Migrants Workers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रमिक स्पेशल ट्रेन:वांद्रे स्टेशनबाहेर परत एकदा परप्रांतीय मजुरांची गर्दी, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टेशन परिसरात जमले 5 हजारांपेक्षा जास्त मजूर , सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा

वांद्रे स्टेशनबाहेर मंगळवारी सकाळी 10-11 वाजेच्या सुमारास श्रमिक स्पेशल ट्रेन पकडण्यासाठी 5 हजारांपेक्षा जास्त लोक एकत्र आले. ज्या ट्रेनमधुन मजुरांना नेण्यात येणार होते, त्या ट्रेनमध्ये फक्त एक हजार प्रवाशांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. स्टेशनबाहेर वाढत असलेल्या गर्दीला पांगवण्यासाटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यानंतर पोलिसांनी सर्व मजुरांना स्टेशनबाहेरून हटवले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रमिक स्पेशल ट्रेन मुंबईवरुन बिहारला जात होती. या ट्रेनसाठी एक हजार प्रवाशांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. परंतू, स्टेशनबाहेर पाच हजारांपेक्षा जास्त मजुर एकत्र आले. दुपारपर्यंत स्टेशनबाहेर मजुरांचा गोंधळ सुरू होता. यादरम्यान पोलिस त्यांना घरी जाण्याची अपील करत होते. यादरम्यान, सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली होती. अखेर ऐकत नसल्यामुळे मजुरांना तेथून हटवण्यासाठी पोलिसांना हलक्या स्वरुपाचा लाठीचार्ज करावा लागला.  स्टेशनवर आलेल्या लोकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

यापूर्वी घडली अशाच स्वरुपाची घटना

एक महीन्यांपूर्वी याच वांद्रे स्टेशनबाहेर हजारो परप्रातींयांनी घरी जाण्याच्या मागणीसाठी गोंधळ घातला होता. यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करुन, त्यांना घरी पाठवावे लागले होते. यात चुकीची माहितीदिल्याच्या आरोपाखाली एका पत्रकारसह 6 जणांवर गुन्हा दाखल झाला होत.

बातम्या आणखी आहेत...