आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई महापालिका निवडणूक:'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'; शिवसेनेकडून गुजराती मतदारांना साद

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 10 जानेवारीला शिवसेनेकडून मुंबईत गुजराती समाजाचा मेळावा आयोजित

पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेची निवडणूकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी शिवसेनेने भाजपची व्होट बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजराती समाजाला साद घालण्यासाठी 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' असा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 10 जानेवारीला शिवसेनेने मुंबईत गुजराती समाजाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी ही माहिती दिली.

भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. या सरकारला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. याकाळात दोन्ही पक्षांनी एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले. दरम्यान, शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही पक्षाने जोरदार तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर गुजराती मतदारांना शिवसेना साद घालणार आहे. या मतदारांच्या माध्यमातून आपल्याकडे खेचण्याचा शिवसेनाचा प्रयत्न आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser