आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:बाराव्या मजल्यावरून उडी मारून आईची सात महिन्यांच्या मुलासह आत्महत्या, एक महिन्यापूर्वीच कोरोनामुळे पतीचाही मृत्यू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील अंधेरी भागातील चांदिवलीमध्ये रेश्मा तेंत्रिल (44) यांनी आपला 7 वर्षाचा मुलगा गरुनसह १२ व्या मजल्यावरून उडी मारली. यामुळे दोघांचा मृत्यू झाला. रेश्मा या माजी पत्रकार होत्या महिन्यापूर्वीच त्यांच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजाऱ्यांना कंटाळून रेश्मा यांनी आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये रेश्मा यांनी शेजारी आयुब खान आणि त्याच्या कुटुंबीयांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी अयूबला अटक केली आहे.

रेश्मा यांचे असे म्हणणे होते की, त्यांच्या मुलाच्या खेळण्यावर शेजाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि बर्‍याचदा त्याच्याशी भांडणही केले. 30 मे रोजी लिहिलेल्या फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये रेश्मा यांनी याचा उल्लेख केला होता.

रेश्मा यांनी सोमवारी आत्महत्या केली, परंतु कुटुंबातील कोणीही सदस्य मुंबईत नसल्याने त्यांचा अंत्यसंस्कार अद्याप करण्यात आलेला नाही. पोलिस रेश्माच्या भावाची अमेरिकेतून परत येण्याची वाट पाहत आहेत.

आरोपीने सोसायटीत रेश्माविरुद्ध तक्रार केली होती
रेश्माच्या सुसाईड नोटच्या आधारे साकीनाका पोलिसांनी अयूबविरूद्ध आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. विभागीय उपायुक्त महेश्वर रेड्डी म्हणाले की, अटक केलेल्या व्यक्तीच्या कुटूंबाने सोसायटीत रेश्माच्या मुलाविरुद्ध तक्रार केली होती. यानंतर सोसायटीने दोन्ही कुटूंबांना बोलावून त्यांची समजूत घातली होती.

त्याचबरोबर अयुबने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, त्याच्या कुटुंबातील सदस्याला गंभीर आजार आहे आणि रेश्माच्या मुलाच्या आवाजामुळे त्यांना झोप येत नव्हती. म्हणूनच त्यांनी सोसायटीत तक्रार केली होती.

पतीच्या निधनानंतर रेश्मा निराशेत होत्या
रेश्मा यांचा पती शरद एका ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीत काम करायचे. शरदचे पालक वाराणसीत राहत होते, पण दोघांचेही कोरोनामुळे निधन झाले होते. शरद जेव्हा वाराणसीला पालकांच्या उपचारासाठी गेला होते, तेव्हा त्यांनाही संसर्ग झाला. त्यानंतर चार आठवड्यांच्या उपचारानंतर 23 मे रोजी शरद यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर रेश्मा खूप अस्वस्थ झाल्या होत्या. पतीच्या निधनानंतर आयुष्य कसे बदलले आणि तिला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले याविषयी त्यांनी सोशल मीडियावर देखील लिहिले होते.

बातम्या आणखी आहेत...