आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्तांची बदली:कोराेना रोखण्यात अपयशी परदेशी यांची उचलबांगडी, इकबाल चहल यांची आयुक्तपदी वर्णी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परदेशी यांच्यासोबतच अतिरिक्त आयुक्तांची बदली झाली आहे

राज्यात कोरोनाने थैमान घातले असल्याने वर्षभर रिक्त जागा भरण्यास व बदल्या करण्यास ब्रेक लावला असतानाच ठाकरे सरकारने शुक्रवारी मुंबईतील ८ ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. बृहन्मुंबईचे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली झाली असून त्यांच्या जागी इक्बाल चहल यांची नियुक्ती केली आहे. 

परदेशी यांची नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर नगरविकास विभागाचे विद्यमान प्रधान सचिव इक्बाल चहल हे आता मुंबई पालिका प्रशासनाचे प्रमुख असणार आहेत. 

मुंबईत करोनाचे प्रादुर्भाव वाढला असताना  प्रशासन निकामी ठरल्याने परदेशी यांना हटवण्यात आले आहे. मुंबईत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडताना झालेला गोंधळ, मद्य दुकानांचे परवाने अचानक मागे घेणे, मैदानात स्थलांतर केलेल्या भाजी मंड्यात झालेली गर्दी, धारावीत कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव आणि  कोरोनाच्या तपासण्या संदर्भातील अटीत वेळोवेळी केलेेले बदल केले हाेते. हे आदेश काढताना पालिका स्तरावर मोठा गोंधळ उडाला होता. 

शिवसेनेसाठी मुंबई पालिका अत्यंत महत्वाची आहे. त्यातच कोरोनाचा मुंबईतील प्रादुर्भाव अनेक  उपाययोजनांतर वाढतच राहिला. परिणामी, परदेशी यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होते. 

बातम्या आणखी आहेत...