आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई महानगरपालिकने 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भाजप नेत्यांनी हा बजेट कारभाऱ्यांसाठी आणि कंत्राटदारांसाठी असल्याची टीका केली आहे.
एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पाएवढा मुंबई महापालिकेचा 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प आज सादर झाला. तसेचअर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी योजनांचा आभाव आणि कारभाऱ्यांना अधिक भाव असा बजेट असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
ट्विट करत, काय म्हणाले आशिष शेलार?
एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पाएवढा मुंबई महापालिकेचा 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प आज सादर झाला. वॉटर, गटर आणि "टेंडर" या पेक्षा मुंबईकरांसाठी एखादी लक्षवेधी ठरावी अशी संकल्पना, योजना याचा अभाव आणि कारभाऱ्यांना अर्थसंकल्पात अधिक "भाव" यापेक्षा काहीही वेगळं नाही.
मेट्रो, कोस्टल रोड, गारगाई धरणासारखे महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबईकरांसाठी आणणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कधी आभार मानले नाहीत, पण दरवर्षी मुंबईची तुंबई करणाऱ्या "कारभार्यांचा" आयुक्तांनी न चुकता जयजयकार केला. हा अर्थसंकल्प होता की अभिनंदनाचा ठराव?
500 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ केला तसा मुळ मुंबईकर असलेल्या कोळीवाडे आणि गावठाणातील नागरिकांना काही देण्याची नियत दिसली नाही. कोविडमुळे अडचणीत आलेल्या मच्छीमार, रिक्षावाले, बलुतेदारांचा संवेदनशीलपणे विचार केला असेही नाही... टेंडर आणि बिल्डर मात्र जोरात!
11000 कोटीची बिल्डरांना केलेली प्रीमियम सवलतीची खैरात.. आणि मालमत्ता कराचे उत्पन्न कमी झाले...कोविड मुळे अर्थचक्राला आलेल्या मर्यादेमुळे उत्पन्नात घट झाली असे सांगितले जात असले तरी अर्थसंकल्पात 17.7% वाढ होऊन 45,949 कोटींनी कसा फुगला? आकडे तरी खरे, की तिथेही लपवाछपवी?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.