आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Municipal Corporation Collected A Fine Of 58 Crores In 449 Days From Those Walking Without Masks, Including A Fine Of 88 Lakhs In The Last 10 Days; News And Live Updates

कोरोनादरम्यान बीएमसीची कारवाई:मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून 449 दिवसांत 58 कोटी रुपयांचा दंड वसूल; गेल्या 10 दिवसांत 88 लाख रुपये

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात दररोज 10 हजारांवर रुग्ण आढळत आहे

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर मुंबई महानगरपालिका कडक कारवाई करत आहे. बीएमसीने गेल्या 449 दिवसांत 58 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये मुंबई पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने लावलेल्या दंडाचा समावेश आहे. ही आकडेवारी एप्रिल 2020 ते 23 जून 2021 दरम्यानची असल्याचे सांगितले जात आहे. विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून 200 रुपये वसूल करण्याचा नियम बीएमसीने तयार केला आहे. गेल्या 10 दिवसांत बीएमसीने 88.76 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मुंबई पोलिसांनी 7 कोटी रुपयांचा दंड वसूल केला

  • कोरोना महामारीदरम्यान, मुंबई पोलिसांनी 7.6 कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. त्याचबरोबर रेल्वेनेदेखील 50.39 लाख दंड वसूल केला असून मध्य रेल्वेने 21.18 लाख, पश्चिम रेल्वेने 22.63 लाख तर हार्बर रेल्वेने 6.5 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. एकट्या बीएमसीने 50.29 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
  • 14 जून रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महानगर पालिकेने 57.54 कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला होता. यामध्ये मुंबई पोलिसांनी 7.41 कोटी रुपये तर मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे लाईनमधून 50 लाख रुपये जमा करण्यात आले होते.

महाराष्ट्रात दररोज 10 हजारांवर रुग्ण आढळत आहे
राज्यात गेल्या 24 तासात 10 हजार 66 कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. यात 11 हजार 32 लोक बरे झाले तर 508 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 59.97 लाख लोक कोरोना महामारीच्या विळाख्यात आले असून यातील 57.53 लाख लोक उपचार घेत बरे झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...