आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:बीएमसीचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा मृत्यू, कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाल्याचा संशय

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांच्या कुटुंबाने मंगळवारी अधिकाऱ्यांना फोन करुन त्यांची तब्येत ठिक नसल्याची माहिती दिली होती

बृहन्मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा आपल्या निवासस्तानी मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतू, बीएमसीने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिली नाही. दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना क्वारेंटाइन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय दीक्षित एसिम्टोमैटिक होते. म्हणजे, त्यांच्या शरिरात कोरोनाची लक्षणे नव्हती. त्यांच्या कुटुंबियांनी मंगळवारी बीएमसीच्या अधिकाऱ्यांना फोन करुन दीक्षित यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या घराकडे एक पथक पाठवण्यात आले होते, परंतू ते पथक पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शिरीष दीक्षित हे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात डीएसपी म्हणून कार्यरत होते. दीक्षित हे पाणीपुरवठा विभागाचे प्रभारीही होते.

0