आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराचे शुक्रवारी (ता. ३१) अखेर ५ हजार ५७५ कोटी ४४ लाख रुपये इतके संकलन करण्यात आले आहे. निर्धारित लक्ष्य ४ हजार ८०० कोटी रुपयांच्या तुलनेत तब्बल ७७५ कोटी रुपयांचे म्हणजेच १६.१४ टक्के अधिक कर संकलन करण्यात करनिर्धारण आणि संकलन खात्यास यश आले आहे.
‘मालमत्ता कर’ हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सदोदित महत्त्वाचा स्रोत राहिला आहे. मालमत्ता धारकांनी कर वेळेत भरावा म्हणून पालिकेने विशेष मोहीम चालवली होती. ३१ मार्च २०२३ रोजी मध्यरात्री १२ वाजता संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली ५ हजार ५७५ कोटी ४४ लाख रुपये इतकी झाली आहे.
अतिशय सुयोग्य नियोजन आणि परिणामकारक अंमलबजावणी यामुळे निर्धारित लक्ष्य रुपये ४ हजार ८०० कोटींपेक्षा साडेसातशे कोटी रुपये अधिक म्हणजेच ५ हजार ५७५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर मुंबई मनपासाठी संकलित झाला आहे. या चांगल्या कामगिरीबद्दल मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.