आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजेट 2021:मुंबई महानगर पालिकेने सादर केले 39 हजार कोटींचे बजेट, आरोग्य विभागासाठी 4,728 कोटींची तरतूद

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य विभागासाठी 4,728 कोटी रुपयांची तरतूद

मुंबई महानगर पालिका (मनपा) आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बुधवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वर्ष 2021-22 चे बजेट सादर केले. या बजेटमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 16.74 जास्त तरतूद करण्यात आली आहे. चहल यांनी बजेटमध्ये 39,038.83 कोटी रुपयांचा महसूल मिळणे आणि 39,027.32 कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज व्यक्त केला आहे. याप्रकारे चालू आर्थिक वर्षात 11.51 कोटी रुपयांचा महसूल सरप्लस राहण्याचा अंदाज आहे.

यापुर्वी 2020-21 च्या बजेटमध्ये 33,441.02 कोटी रुपयांचा महसूल मिळणे आणि 30,861.36 कोटी रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, प्रत्यक्षात 6.75 टक्के (2,258.42 कोटी रुपये) कमी होऊन 31,182.60 कोटी रुपये मिळाले. या प्रकारेच 30,861.36 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज असताना, 0.99 टक्के (306.8 कोटी रुपये) जास्त खर्च होऊन 31,168.16 कोटी रुपये महसूल मिळाला.

आरोग्य विभागासाठी 4,728 कोटी रुपयांची तरतूद

मुंबई मनपाच्या 2021-22 च्या बजेटमध्ये आरोग्य विभागासाठी 4,728.53 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात भगवती हॉस्पीटलच्या रि-डेवलपमेंटसाठी 75 कोटी, सायन हॉस्पीटलच्या प्रिमायइसेजच्या रि-डेवलपमेंटसाठी 75 कोटी, नायर डेंटल हॉस्पीटलच्या विस्तारासाठी 71.88 कोटी, केईएम हॉस्पीटलमधील प्लाजमा सेंटरच्या अपग्रेडेशनसाठी 20 कोटी रुपये मंजुर झाले आहेत. याशिवाय, गोरेगावच्या लिंक रोडसाठी 1300 कोटी, कोस्टल रोडसाठी 2,000 कोटी रुपये मंजुर झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...