आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:महापालिकेचे ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण, पहिल्याच दिवशी 365 नागरिकांना दिली लस

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या दिवशी २२७ वाहनांतून आलेल्या ३६५ नागरिकांचे लसीकरण केले

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस घेण्‍यासाठी सहज, सोपी सुविधा मिळावी म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागाने मंगळवारपासून ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमास पहिल्याच दिवशी नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून पहिल्या दिवशी २२७ वाहनांतून आलेल्या ३६५ नागरिकांचे लसीकरण केले.

कोविड संसर्ग मुंबईत वाढीस लागल्‍यानंतर दादर (पश्चिम) परिसरातील जे. के. सावंत मार्गावरील कोहिनूर वाहनतळ येथे जी/ उत्तर विभाग कार्यालयाने ड्राइव्ह इन कोविड चाचणी केंद्र सुरू केले होते. याद्वारे दादर परिसरातील चाचण्यांदा वेग देण्यास मोठी मदत झाली होती. त्या धर्तीवर ड्राइव्‍ह इन कोविड प्रतिबंध लसीकरण केंद्र सुरू करण्‍याचा निर्णय विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी घेतला. आजपासून हा उपक्रम प्रत्‍यक्षात सुरू झाला आहे.

कोविड प्रतिबंध लसीकरणासाठी रुग्णालयांमध्ये निर्देशित केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना सर्व प्रक्रिया पार पडेपर्यंत काही वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. तसेच लस घेतल्यावर त्यांना निरीक्षणाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते. काही प्रसंगी अशी स्थिती ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना गैरसोयीची ठरू शकते. सध्‍या घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मुभा सरकारने दिलेली नाही. त्‍यामुळे यावर मध्यममार्ग म्‍हणून, ड्राइव्‍ह इन लसीकरण उपक्रम सुरू केला आहे. यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना वाहनात बसूनच लस टाेचली जाते. लसीकरण केंद्रामध्‍ये येतात व लस टोचून घेतात. दादर येथील कोहिनूर वाहनतळावर असे दोन बूथ आहेत. तेथे लस घेण्यासाठी वाहनात बसूनच नाेंदणी देखील करता येते.

बातम्या आणखी आहेत...