आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोर तर चोर आणि वर शिरजोर:रस्त्यावर हातगाडी लावून विकत होते सामान, कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना केली मारहाण

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सातत्याने दादागिरी करत आहेत येथील फेरीवाले

मुंबईला लागून असलेल्या नालासोपारा येथील रहमत नगर भागात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगर पालिका (मानपा) कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांनी जोरदार मारहाण केली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरण हाताळले. सध्या पोलिसांनी 6 जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून 3 जणांना ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

अशाप्रकारे हा वाद सुरू झाला
मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे अनेक प्रकरण यापूर्वी समोर आले आहेत. सोमवारी सायंकाळी 6 वाजता प्रभाग समिती (ब) चे कर्मचारी मधुकर गणपत डोंगरे ( 46) पथकासह नालासोपारा (पूर्व) रहमत नगर भागात अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेले होते. तेवढ्यात काही हाथगाडीवाल्या फेरिवाल्यांनी डोंगरेवर हल्ला केला. ही टीम बचावासाठी आली तेव्हा फेरीवाल्यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरवात केली. दरम्यान, फेरीवाल्यांनी डोंगरे यांना खाली पाडले आणि त्यांना मारहाण केली. फरीवाल्यांच्या गटाने तेथे जोरदार गोंधळ घातला.

सातत्याने दादागिरी करत आहेत येथील फेरीवाले
स्थानिक लोकांनुसार, वसई-विरारमध्ये अवैध फेरीवाल्यांच्या दादागिरीने सर्वच त्रस्त आहेत. खरेदी करताना भाव कमी करतानाही हे दादागिरी करायला सुरुवात करतात. घटनास्थळी पोहोचलेल्या तुलिंज पोलिसांनी 3 लोकांना ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...