आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईत नवीन वर्षाच्या पार्टी दरम्यान एका 19 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात एका तरुण आणि तरुणीला अटक करण्यता आली आहे. पीडित मुलीची चूक एवढीच होती की आरोपी जोडपे तिला नको त्या अवस्थेत दिसले होते. त्याच्याच रागात दोघांनी आधी त्या मुलीला बेदम मारहाण केली. त्यानंतर छतावरून फेकून दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय जान्हवी कुकरेजा हिच्या हत्या प्रकरणी 22 वर्षीय जोगधणकर आणि 19 वर्षीय दिया पडणकर यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांची सध्या चौकशी केली जात आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जान्हवीच्या आईने केली.
जान्हवी कुकरेजाच्या डोक्यावर मारहाणीच्या खुना सापडल्या आहेत. खार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन काबुले यांनी सांगितल्याप्रमाणे, "पश्चिम खार परिसरातील एका इमारतीच्या छतावर नवीन वर्षाची पार्टी सुरू होती. इतर मित्र आणि मैत्रिणींसोबत येथे जान्हवी सुद्धा होती. पार्टीच्या शेवटी जान्हवी आणि आरोपींमध्ये भांडण झाले. यानंतरच कथितरित्या त्या दोघांनी जान्हवीची हत्या केली. दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना 7 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी सरकारने आधीच पार्ट्यांवर बंदी लादली होती. त्यातही अशी पार्टी झालीच कशी यावरही पोलिस वेगळा एफआयआर करण्याच्या तयारीत आहे. सोबतच, पार्टीत असलेल्यांपैकी बहुतांश लोकांनी मद्यसेवन केले होते. पोलिस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी जान्हवी रक्तात माखलेली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले त्याचवेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही घटना आता नेमकी कशी घडली याचा पोलिस सविस्तर तपास करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.