आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाला जीवदान:नवजात बाळाला नाल्यात फेकले, मांजरींनी पाहताच सुरू केला आरडाओरडा; नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने वाचला बाळाचा जीव

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नवजात बाळाला नाल्यात फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळाला एका कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकण्यात आले होते. त्यानंतर तो बाळ वाहून जात होते. तितक्यात रस्त्यावरील काही मांजरींनी जोरजोरात आरडाओरड सुरू केली. त्यानंतर लोकांच्या सावधगिरीने आणि पोलीसांच्या मदतीने त्या बाळाला वाचवण्यास यश आला आहे. ही घटना मुंबईतील पंतनगर या परिसरात घडली आहे.

सोमवारी संध्याकाळी कोणीतरी नवजात बाळाला कपड्यात गुंडाळून नाल्यापाशी आणून वाहत्या नाल्यात फेकले होते. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या काही मांजरांना ते दिसले आणि त्यांना जोरजोरात आरडाओरड सुरू केली. मांजर जोरजोरात ओरडत असल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेत. मांजर का ओरडत आहे याची पाहणी सुरू केली. तितक्यात काही जणांना नाल्यात बाळ वाहून जात असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी तात्काळ पोलीसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी देखील तात्काळ धाव घेत त्या बाळाला जीवदान दिले आहे.

बाळाच्या आई-वडिलांचा शोध सुरू
पोलीसांनी वाचवलेल्या त्या बाळाच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला आहे. बाळ सध्या सुखरूप असून त्याला राजावाड़ी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बाळाला नेमकं कोणी नाल्यात फेकले? तसेच त्या बाळाचे आई-वडिल कुठे आहे? याचा तपास सध्या पोलीस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...