आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:क्रिकेटमध्ये करिअर करताना संधी मिळत नसल्याने किकेटपटूची आत्महत्या, करण तिवारीने गळफास घेत संपवले जीवन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील एका तरुणाने क्रिकेट करिअरमध्ये चांगली संधी मिळत नसल्याने आपले जीवन संपवले आहे. सोमवारी रात्री राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. करण तिवारी असे या क्रिकेटपटूचे नाव आहे.

सोमवारी कुटुंबीयांनी बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा करणने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडे दहा वाजता गोकुळधाम कोनू कपाउंडमध्ये करनने आत्महत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांना करणच्या बेडरुममधून सुसाइट नोटही सापडली. या घटनेची नोंद कुरार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. आयपीएलसाठी संघाची निवड झाल्याची माहिती त्याला मिळाली होती. मात्र यामध्ये आपलं सिलेक्शन न झाल्याने तो नाराज होता.

मित्राला फोन करुन दिली होती माहिती
करणने अखेरचा फोन त्याच्या मित्राला केला होता. तसेच त्याच्या नैराश्याविषयीही त्याला सांगितले होते. राजस्थानमध्ये असलेल्या आपल्या मित्राला फोन करुन तो म्हणाला होता की, मी मानसिक तणावात आहे. मी आत्महत्या करतोय असंही तो म्हणाला होता. यानंतर मित्राने तातडीने याची माहिती राजस्थानमध्येच राहत असलेल्या करणच्या बहिणीला दिली होती. हे कळाल्यानंतर बहिणीने त्याच्या आईला याविषयी माहिती दिली. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

बातम्या आणखी आहेत...